ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
फाडपाड बोलण्याच्या इंग्लिशचे प्रणेते डॉ. महादेव कोकाटे यांची निकेत पावसकर यांच्या 'अक्षरघराला' भेट.

फाडपाड बोलण्याच्या इंग्लिशचे प्रणेते डॉ. महादेव कोकाटे यांची निकेत पावसकर यांच्या 'अक्षरघराला' भेट.

प्रकाशन: 09 Oct 2022 12:56 PM
वाचन संख्या 56

संतोष साळसकर | ब्युरोचीफ :
फाडफाड बोलण्याचे कोकाटे इंग्लिश अशी ओळख असणारे, आपला मराठी तरुण इंग्रजी बोलला पाहिजे यासाठी गेली ४ दशके सातत्याने काम करणारे आणि कोकाटे स्पिकिंग इंग्लिश या स्वत:च्या इंग्लीश तंत्राचे संशोधक डॉ. महादेव कोकाटे यांनी अलिकडेच निकेत पावसकर यांच्या ‘अक्षरघरला’ सदिच्छा भेट दिली.

डॉ. महादेव कोकाटे हे मुळचे सिंधुदूर्ग जिल्ह्यातील वारगाव (ता. कणकवली) येथील असुन त्यांनी आपल्या इंग्लिशच्या वेगळ्या तंत्रामुळे अनेक राजकिय मंडळी, मोठमोठे अधिकारी आणि सर्वसामान्य नागरिक यांना इंग्रजी बोलायला शिकविले. १०० टक्के इंग्रजी बोलायला शिकवणारे हे तंत्र आपणही अवगत करुन घ्यायला काहीही हरकत नाही.

त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे फक्त एक तासाचा स्पिकिंग इंग्लिशचा कोर्स. त्यात पहिल्या अर्ध्या तासात मोफत बोलण्याची इंग्लिश शिकून ५० टक्के इंग्लिश बोलता आले नाही तर पाच हजाराचे बक्षिस..!
पुढच्या अर्ध्या तासात तुम्ही इंग्रजी बोलायला शिकून जग जिंकायला तयार व्हाल. यशाची खात्री आजपर्यंतचे त्यांचे अनेक अधिकारी, राजकिय मंडळी आणि इतर विद्यार्थी स्वानुभवातून देतात.

अनेक इंग्रजी पुस्तकाचे लेखक आणि स्वत: विकसित केलेल्या इंग्रजी तंत्राचे संशोधक डॉ. महादेव कोकाटे यांच्याशी संपर्क साधण्यासाठी ९८२१६०४१८८ किंवा ९५८८६४१२२५ किंवा या क्रमांकांवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स