ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
मनसे हिंदू जनजागृती करत आंदोलन छेडणार : मनसे जिल्हा सरचिटणीस परशुराम उपरकर.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

मनसे हिंदू जनजागृती करत आंदोलन छेडणार : मनसे जिल्हा सरचिटणीस परशुराम उपरकर.

प्रकाशन: 08 Oct 2022 05:31 PM
वाचन संख्या 38

मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करताना इतर अवैध गोष्टींवर कारवाई का नाही असा परखड सवाल.

कणकवली | ब्युरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथे मनसे जिल्हा सरचिटणीस व माजी आमदार परशुराम ऊर्फ जिजी उपरकर यांनी पोलिस प्रशासन व सरकारला परखड प्रश्न उपस्थित केले आहेत.
देशभरात व राज्यात पीएफआय संघटनेच्या कार्यालयांवर छापे टाकल्यानंतर पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देणाऱ्या समाजकंटकांवर कारवाईची मागणी मनसेने केली. यासाठी सावंतवाडी येथे उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन देत हिंदुस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्या. मनसेच्या या कार्यकर्त्यांवर पोलीस गुन्हे दाखल करत असतील तर इतर अवैध धंद्यांबाबत हेच पोलीस गप्प का? याबाबत मनसेच्यावतीने हिंदू जनजागृती करत लवकरच आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा मनसेचे सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी दिला आहे.
संपूर्ण देशभरात पीएफआईच्या कार्यालयांवर धाडी टाकल्यानंतर पुण्यामध्ये काही समाजकंटकानी पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्या. हे देश विघातक कृत्य आहे. त्यामुळे अशा समाजकंटकांवर कारवाईसाठी मनसेच्यावतीने सावंतवाडी येथील उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. मुख्यमंत्र्यांपर्यंत पाठविण्यासाठी देण्यात आलेल्या या निवेदनावेळी हिंदुस्तान झिंदाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद च्या घोषणा मनसेच्या कार्यकर्त्यांनी दिल्या. जिल्ह्यात मनाई आदेश असताना अशा घोषणा दिल्याचे सांगत मनसेच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मुळात ज्या समाजकंटकानी पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्या त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यास वेळ लावण्यात आला.
त्यानंतर केंद्र शासनाने या संघटनेवर बंदी आणली तर नुकत्याच झालेल्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्र्यांनीही असा प्रकार खपवून घेतला जाणार नाही असा इशारा दिला. मात्र असे असताना उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या बाहेर हिंदुस्तान झिंदाबाद पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देणे हा गुन्हा आहे का? याबाबत आम्ही मुख्यमंत्र्यांची पत्रव्यवहारही करणार असल्याचे परशुराम उपरकर यांनी म्हटले आहे.
मनाई आदेशाचा भंग म्हणून पोलीस असे गुन्हे दाखल करत असतील, तर जिल्ह्यात अवैध इतर धंदे राजरोस सुरू आहेत ते सर्व कायद्यात बसते आहे का? याबाबत पोलीस गप्प का आहेत असा सवाल मनसे जिल्हा सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केला.
या साऱ्या प्रकाराबाबत हिंदूंमध्ये जनजागृती करत लवकरात मनसेच्यावतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा परशुराम उपरकर यांनी दिला आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स