ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर पातळी सोडून टीका केल्यास माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची कुंडली काढू : प्रज्ञा ढवण.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर पातळी सोडून टीका केल्यास माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची कुंडली काढू : प्रज्ञा ढवण.

प्रकाशन: 08 Oct 2022 12:47 PM
वाचन संख्या 79

कणकवली | प्रतिनिधी : भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र च्या प्रदेश कार्यकारणी सदस्य प्रज्ञा प्रदीप ढवण यांनी मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.
मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर या मातोश्रीच्या परिसरातील असंतुष्ट आत्मा आहेत असे म्हणत त्यांनी शिवसेना ही किशोरी पेडणेकर यांच्या उपजीविकेचे साधन असल्यामुळे पडत्या फळाची आज्ञा घेऊन त्या मातोश्रीचे काम पाहतात अशी टीका भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र च्या प्रदेश कार्यकारणी सदस्य प्रज्ञा प्रदीप ढवण यांनी केली.

महाराष्ट्राच्या जनतेने यापूर्वी देखील किशोरीताईंचे विविध स्टंट आणि नौटंकी पाहिली आहे. खोटे खोटे रडणे , विचित्र कंठ काढून बोलणे, विचित्र चाली लाऊन गाणी म्हणणे असे विचित्र चाळे करून प्रसिद्धी मिळवणारी त्या महिला असून मुंबई महानगरपालिकेत महापौर असताना त्यांनी प्रचंड भ्रष्टाचार केला त्याचप्रमाणे मातोश्रीची पहिली महिला कॅश कलेक्टर म्हणून काम पाहिले असा आरोप देखील केला आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे साहेब किशोरी पेडणेकर यांना आजही आपली बहीण मानतात.त्यांची कौटुंबिक संबंध आजही तेवढेच आहेत परंतु मातोश्रीला खुश करण्यासाठी आणि पुढील निवडणुकांच्यात आपले तिकीट कापू नये यासाठी राणे साहेबांवर टीका करायची हा त्यांचा हेतू आहे पण यापुढे राणे साहेबांवर पातळी सोडून टीका केल्यास तुमचे जनतेला ज्ञात नसलेले विषय आम्ही ज्ञात करून देऊ याचे भान ठेवावे असा इशारा प्रदेश कार्यकारणी सदस्य प्रज्ञा ढवण यांनी दिला आहे .

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स