लोकमान्य मल्टीपर्पज को.ऑप.सो.बांदा शाखेच्या वतीने महिलांचा सन्मान..!
बांदा | राकेश परब : नवरात्र उत्सव निमित्ताने लोकमान्य मल्टीपर्पज को.ऑप . सो . बांदा शाखेच्या वतीने महिला नवदुर्गा सन्मान कार्यक्रम करण्यात आला. यासाठी बांदा येथील पहिल्या काथ्या उद्योजीका,महिला बचत गट ट्रेनर , समाजसेवीका , तसेच सिंधुदुर्गातील प्रथम महिला दशावतार नाट्य मंडळाला महाराष्ट्र शासन पुरस्कार मिळवून देणाऱ्या सौ.अपर्णा आप्पा आगलावे यांचा लोकमान्य मल्टीपर्पज को.सो. बांदा याच्या मार्फत सन्मानपत्र व भेटवस्तू देऊन शाखाव्यवस्थापक श्री. उमेश परब यांच्या हस्ते गौरव करण्यात आले. यावेळी लोकमान्य मल्टीपर्पज को. ऑप. सो. च्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. तसेच संस्थेचे माहितीपत्रक वाटण्यात आले.यावेळी शाखा व्यवस्थापक उमेश परब, सहाय्यक लिपिक सौ. श्रीया पास्ते, सहाय्यक लिपिक सर्वेश प्रभु, ऑफीस परिचर ज्ञानेश्वर येडवे,चैतन्य महीला विकास मंडळ बांदा गडगेवाडी,ता. सावंतवाडी यांची स्थापना २००६ साली झाली. यांनी सर्वप्रथम बांदा गावात महीला मंडळाच्या मार्फत काथ्या व्यवसाय सुरूवात केला. तसेच रक्तदान शिबीर, आरोग्य तपासणी, पाणी शुद्धीकरण,हाॅटेल व्यवसाय, शाळेतील मुलांना शैक्षणिक साहीत्य वाटप,दूध व्यवसाय, शेती व्यवसाय, भाजीपाला लागवड, दिपावली साहित्य, टेलरिंग व्यवसाय, महिला दशावतार नाट्य मंडळ, असे अनेक उपक्रम या मंडळामार्फत राबवण्यात आले. नाट्य मंडळाला महाराष्ट्र शासन पुरस्कार मिळाला आहे.या नाटकाचे सादरीकरण पुणे , मुंबई , कर्नाटक या ठीकाणी झाले आहे. या सर्व गोष्टींची दखल घेत या लोकमान्य मल्टीपर्पज को.सो. कडून या मंडळाला सन्मानित करण्यात आले. या मंडळाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)