शिवतिर्थावर शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारेंनी शिंदे गट व भाजपावर डागली तोफ…!
मुंबई | ब्युरोन्यूज : मुंबईतील शिवतिर्थावरील पारंपारिक दसरा मेळाव्याला शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भाषणातून विरोधकांवर थेट हल्ला चढवला.
इडीच्या कार्यालयात विरोधकांचे हिंदुत्व जागृत होत असल्याचा त्यांनी टोला लगावला आहे.
सन्माननीय दीपक केसरकरांनी ‘बाॅम्बे टू गोवा टूरचा’ हिशेब अजून दिला नसल्याचेही त्यांनी किरीट सोमैय्यांना सुनावले.
हिंदुत्ववादासाठी एकत्र आलेल्यांना सर्वसमावेशक हिंदुत्व मान्य नाही हेच सत्य असल्याचे प्रतिपादन शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला कायद्याची भाषा व चौकटीत रहायचा सल्ला देऊ नये असाही सल्ला त्यांनी दिला.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)