गोंधळी समाजाला शासनाकडून लागणारे सहकार्य आम्ही नेहमी करू : प्रांताधिकारी वैशाली राजमाने.
कणकवली | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुका गोंधळी समाज संघ यांच्यावतीने विराजमान झालेल्या दुर्गामातेचा उपक्रम कौतुकास्पद आहे. यापुढेही गोंधळी समाजाने एकजुटीने राहुन सातत्याने समाजाला प्रगतीच्या दिशेने जाण्यासाठी प्रयत्न करावेत. शासनाकडून लागणारे सहकार्य आम्ही आपल्याला नेहमी करू असा आशावाद वैशाली राजमाने यांनी केला. दर्शनासाठी कणकवलीच्या प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांनी उपस्थित राहून दुर्गामातेचे दर्शन घेतले.
त्यावेळी गोंधळी समाजाच्या वतीने त्यांना आरतीचा मान देण्यात आला.
त्यावेळी उपस्थित गोंधळी समाजाचे सल्लागार शिवाजी भिसे , मराप्पा इंगळे, हनुमंत इंगळे, रमेश कांबळे, विनोद इंगळे, विजय म. इंगळे, शंकर वाघमारे, कृष्णा इंगळे, दिपक वाघमारे, विजय इंगळे, राजू इंगळे, अनिल इंगळे, तसेच अन्य समाज बांधव उपस्थित होते. तसेच कणकवलीच्या प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांना गोंधळी समाजतर्फे सामाजिक कार्यकर्ते शशिकांत इंगळे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी गोंधळी समाजाने प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांचे आभार मानले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)