ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
मुख्याधिकारी संतोष जिरगे यांचा रोटरी क्लबने केला विशेष सत्कार.!

मुख्याधिकारी संतोष जिरगे यांचा रोटरी क्लबने केला विशेष सत्कार.!

प्रकाशन: 04 Oct 2022 04:04 PM
वाचन संख्या 101

रोटरी क्लब मालवणचे अध्यक्ष रतन पांगे यांच्या हस्ते झाला सन्मान.

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण रोटरी क्लबने आज, नगरपरिषद मुख्याधिकारी संतोष जिरगे यांचा सत्कार केला.
भारतीय केंद्र शासनाने आयोजित केलेल्या अमृत महोत्सव अंतर्गत इंडियन ) स्वच्छता लीग स्पर्धेत मालवण नगरपरिषद अव्वल ठरली. या स्पर्धेत ‘मालवण वाॅरीअर्स’ चे नेतृत्व करणारे नगरपरिषद मुख्याधिकारी संतोष जिरगे यांचा विशेष पुरस्कार देऊन देशपातळीवर सन्मान करण्यात आला होता.

Article image


या पार्श्वभूमीवर मालवण रोटरी क्लबच्या वतीने मुख्याधिकारी तथा प्रशासक संतोष जिरगे यांचा मंगळवारी विशेष सत्कार करण्यात आला.

यावेळी मालवण नगरपरिषद शहर समन्वयक निखिल नाईक, बांधकाम पर्यवेक्षक सुधाकर पाटकर, लिपिक महेश परब, पाणी पुरवठा अभियंता राजा केरीपाळे यांचाही सहकार्य व सेवेबद्दल रोटरी क्लबने सन्मान केला.
मालवण नगरपरिषद कर्मचारी वृंदाचीही रोटरी क्लबने प्रशंसा केली.

Article image

मालवणच्या रोटरी क्लब अध्यक्ष रतन पांगे यांनी यांनी मुख्याधिकारी संतोष जिरगे यांना सन्मानित केले.
या सत्कार समारंभाला सेक्रेटरी रो. अभय कदम, खजिनदार रो. रमाकांत वाक्कर, माजी अध्यक्ष रो. उमेश सांगोडकर, रो. डॉ. अजित लिमये, रो. डॉ. लीना लिमये, रो. बाळू तारी, रो. भाऊ साळगावकर, रो. अनिल चव्हाण, रो. चाचा हडकर, रो. अजय जोशी, रो. ऋषिकेश पेणकर, रो. संदेश पवार, रो. रंजन तांबे विशेष उपस्थित होते.

(फोटो सौजन्य: मालवण ब्युरो)

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स