वेंगुर्ले येथे आनंदयात्री वाङमय मंडळातर्फे ८ ऑक्टोबरला कोजागिरीनिमित्त " चांदणझुला" कवीसंमेलन.
संतोष साळसकर | ब्युरोचीफ : आनंदयात्री वाङमय मंडळातर्फे कोजागिरीनिमित्त ‘ चांदणझुला ‘ या नावाचे कवीसंमेलन शनिवार दिनांक ८ ऑक्टोबरला दुपारी ३.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत कवीवर्य विठ्ठल कदम यांच्या अध्यक्षतेखाली वेंगुर्ला येथील साई दरबार हाॅलचे स्टेज येथे कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
वेंगुर्ला तालुक्याला समृद्ध अशी साहित्यिक परंपरा आहे. आरती प्रभू, मंगेश पाडगावकर अशा नामवंत कवींचे बालपण वेंगुर्ला तालुक्यात गेले. आजही वेंगुर्ला तालुक्यात अनेक लिहिते होत आहेत. अशा नवोदिताना व्यासपीठ देऊन प्रेरणा व दिशा देण्याचे काम आनंदयात्री वाड़्मय मंडळ करीत असते.
तरी दिनांक ८ ऑक्टोबरला कवीसंमेलनाला सर्वांनी उपस्थित राहून आम्हाला सहकार्य करावे. आमच्या नवोदित कवींच्या कविता ऐकाव्यात. त्यामुळे आमच्या कवीना प्रोत्साहन मिळेल. यासाठी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहै. असे आवाहन वृंदा कांबळी ( संयोजिका) आनंदयात्री वाड़्मय मंडळ आणि आनंदयात्री वाड़्मय मंडळाचे सर्व सदस्य यांनी केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)