ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
डेगवे श्री माऊली मंदिरात नवरात्रोत्सवा निमित्त कळसुत्री बाहुल्यांचा कार्यक्रम संपन्न..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

डेगवे श्री माऊली मंदिरात नवरात्रोत्सवा निमित्त कळसुत्री बाहुल्यांचा कार्यक्रम संपन्न..!

प्रकाशन: 03 Oct 2022 05:16 PM
वाचन संख्या 69

बांदा | राकेश परब :
सावंतवाडी तालुक्यातील डेगवे गावच्या श्री माऊली मंदिरात नवरात्रोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होत आहेत.यात प्रतिदिवशी श्री माऊली,ब्राह्मणी पंचायतन देवता़ची पुजा करणे.पुष्पहार घालणे , सकाळी,संध्याकाळी आरती,भजन,किर्तन सादर केले जात आहे. तसेच भजनाची डबलबारी सुद्धा झाली.

Article image

त्याचप्रमाणे दशावतारी नाट्यप्रयोग करण्यात आले. यातच एक वेगळा असा कळसुत्री बाहुल्यांचा कार्यक्रम सादर करण्यात आला.अशाप्रकारे विविध कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले. यावेळी कुडाळ पिंगुळी येथील लोककला कळसुत्री बाहुल्यांचा कार्यक्रम श्री ब्राह्मणी,इश्वटी प्रासादिक भजन मंडळ,आंबेखणवाडी यांनी आज प्रायोजित केला होता.सदर ” कार्यक्रम कुडाळ तालुक्यातील पिगुंळी येथील.लोककलाकार श्री परशुराम गंगावणे यांच्या सहकारी मंडळी यांनी उत्कृष्टपणे सादरीकरण करून भाविक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.त्यामुळे सदर मंडळाचा सन्मान डेगवे ग्रामस्थ व माजी सरपंच श्री मंगलदास देसाईयांच्या व शामसुंदर देसाई व इतर ग्रामस्थ यांच्या शुभहस्ते करण्यात आला.यावेळी डेगवे गावचे माजी सरपंच श्री मंगलदास देसाई,इतर ग्रामस्थ उपस्थित होते.सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वश्री विनय देसाई,सदानंद देसाई,शामसुंदर देसाई,दिपक देसाई,वामन देसाई,योगेश मांजरेकर,गोपाळ देसाई वासुदेव देसाई,उत्तम देसाई,बाबली देसाई,मधुकर देसाई सुर्याजी देसाई व इतर डेगवे, आंबेखणवाडीतील ग्रामस्थ,गावातील मंडळी यांनी विशेष प्रयत्न केले.सदर कार्यक्रमात डेगवे आंबेखणवाडी,फणसवाडी,जांभळवाडी,बाजारवाडी,मोयझरवाडी,वराडकरवाडी इत्यादी वाडी वरील ग्रामस्थांच्या भजन मंडळांनी मोठ्या उत्साहाने कार्यक्रमात भाग घेतला होता. सदर कार्यक्रमात गावातील सर्व ग्रामस्थ,तरुण मंडळी,महिला यांची उपस्थिती उल्लेखनीय असल्याने नवरात्रातील वातावरण रममाण झाले आहेत.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स