नगरपरिषद मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी मानले माजी नगरसेवकांचे आभार.
मालवण वासियांनाही दिले विशेष धन्यवाद.
मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण नगरपरीषद या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव निमित्ताने आयोजीत देशपाळीवरील ‘इंडिअन स्वच्छता लीग’ स्पर्धेत देशात अव्वल ठरली. १५,००० ते २५,००० लोकसंख्या असणार्या शहरांमध्ये मालवण नगरपरिषद ‘मालवण वाॅरीअर्स’ हा स्वच्छता संघ घेऊन उतरली होती.
दिल्लीत झालेल्या या स्पर्धैच्या गौरव सोहळ्याला मालवण नगरपरिषद मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी मालवण शहर व नगरपरिषदेच्या वतीने हा गौरव स्विकारला.
यानंतर मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी या खडतर स्पर्धेमध्ये योगदान देणार्या सर्व मालवण वासियांचे अभिनंदन करुन त्यांना धन्यवाद दिले.
या उपक्रमात सक्रीय व अमूल्य योगदान , मार्गदर्शन व स्वच्छता जागर केलेल्या सर्व माजी नगरसेवक, पदाधिकारी, स्वयंसेवक यांचे त्यांनी विशेष जाहीर आभार मानले.
नगरपरिषद प्रशासनाची टीम , प्रशासकीय अधिकारी व सर्व कर्मचारी यांचे यासाठी बहूमूल्य सहकार्य लाभले असेही मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी स्पष्ट केले आहे.
आगामी काळातही सर्व मालवण वासिय, विविध पदाधिकारी व माजी नगरसेवक यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभून मालवण नगरपरिषद सर्वच पातळ्यांवर अग्रेसर राहील अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)