ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
सुप्रसिद्ध 'रावराणे मंडळ' यांच्या अध्यक्ष पदी गणपत रावराणे तर सरचिटणीस पदी सुबोध रावराणे यांची निवड..!

सुप्रसिद्ध 'रावराणे मंडळ' यांच्या अध्यक्ष पदी गणपत रावराणे तर सरचिटणीस पदी सुबोध रावराणे यांची निवड..!

प्रकाशन: 02 Oct 2022 10:07 PM
वाचन संख्या 143

शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात अथक अग्रेसर असलेले ‘रावराणे मंडळ’..!

वैभववाडी | नवलराज काळे :सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यात सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या सुप्रसिद्ध ‘खोरकर (अरुळेकर ) रावराणे मंडळ’ यांच्या पदाधिकाऱ्यांची आज निवड बैठक संपन्न झाली . या बैठकीत मंडळाचे नवे अध्यक्ष म्हणून श्री
गणपत दाजी रावराणे यांची तरसरचिटणीस पदी श्री. सुबोध पुंडलिक रावराणे यांची एकमताने निवड झाली आहे.

वैभववाडी तालुक्यातील बारा गावातील रावराणे समाजाचे हे सुप्रसिद्ध मंडळ असून गेली अनेक वर्षे हे मंडळ सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात काम करत आहे.
रविवारी विद्यार्थी उत्कर्ष मंडळ,चिंचपोकळी येथे सायंकाळी बैठक पार पडली.या बैठकीत 25 पैकी 24 सदस्य उपस्थित होते.यावेळी मंडळाचे नवे अध्यक्ष म्हणून गणपत दाजी रावराणे यांची पुनर्निवड तर सरचिटणीस पदी सुबोध पुंडलिक रावराणे यांची एकमताने निवड झाली आहे.
उपाध्यक्ष म्हणून श्री. सदानंद दत्ताराम रावराणे, श्री.शैलेंद्र सच्चिदानंद रावराणे,कार्याध्यक्ष प्रभानंद शंकर रावराणे,खजिनदार मोहन बाळकृष्ण रावराणे,सहचिटणीस सत्यवान बाळकृष्ण रावराणे जयसिंग परशुराम रावराणे,यांची निवड झाली आहे.

या मंडळाची कार्यकारिणी खालील प्रमाणे घोषीत झाली आहे.
या मंडळात १७ कार्यकारिणी सदस्य म्हणून सर्व श्री. प्रताप बाळकृष्ण रावराणे, उदय विनायक रावराणे, ज्ञानेश्वर त्रिंबक रावराणे मिलिंद विश्वनाथ रावराणे, संजय पांडुरंग रावराणे,संतोष सीताराम रावराणे ,सागर अरुण रावराणे, महेश रघुनाथ रावराणे,श्रीधर मधुकर रावराणे,राकेश रणजित रावराणे,महेश प्रकाश रावराणे,प्रभाकर गणपत रावराणे,विनायक सज्जन रावराणे,विजय बाळकृष्ण रावराणे,विक्रम दुलाजी रावराणे,अर्जुन बाबुराव रावराणे,सुरेश विष्णू रावराणे,यांची सदस्य म्हणून निवड झाली आहे.

आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल समूहाचे मुख्य संचालक श्री विजय रावराणे यांनी मंडळाचे अध्यक्ष,उपाध्यक्ष व सर्व कार्यकारिणीचे विशेष अभिनंदन केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स