डंपर व एसटी यांच्यात झालेल्या अपघात वाळू व्यावसायिकांच्या दबावामुळेच मिटवला ;मनसेच्या अमित इब्रामपूरकरांचा आरोप.
मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मनसेचे अमित इब्रामपूरकर यांनी आरोप करत मालवण जवळच्या आनंदव्हाळ येथे शनिवारी डंपर-एसटी यांच्यात झालेल्या अपघाताला एक वेगळेच वळण दिले आहे.
डंपरच्या धडकेने एसटीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.डंपर मालकाने एसटीचे झालेले नुकसान भरपाई देण्याचे मान्य करण्यात आले अशी माहिती मालवण एसटी आगार व्यवस्थापक यांनी दिली असली तरी अमित इब्रामपूरकर यांच्या आरोपानुसार , एसटीच्या नियमावली मध्ये जर एसटी बसचे अपघातामुळे नुकसान झाले तर त्याची तक्रार पोलीस स्थानकाला देऊन पंचनामा करून संबंधितांवर गुन्हा दाखल करावा लागतो. परंतु मालवण आगार व्यवस्थापकांनी अशा प्रकारच्या हालचाली न करता वाळू व्यवसायिकांच्या दबावाखाली प्रकरण दाबले आहे .
सत्तेत असलेल्या बड्या राजकीय नेत्याच्या फोनाफोनीमुळे प्रकरण दाबल्याचि चर्चा आहे असा आरोपही त्यांनी केला आहे .
फोनाफोनी करणारा राजकीय नेता कोण? एसटीचे झालेले नुकसान कोणी ठरवले? आगारव्यवस्थापकांना स्वतः व्हॅल्युएशन करण्याचा अधिकार आहे का? सदर अपघात झाल्यानंतर पोलिस अधिकारी उपस्थित काही वाळु व्यावसायिकांचे प्रतिनीधी उपस्थित राहुन दुचाकींना रस्ता मोकळा करुन देत होते तसेच डंपरचे पासिंग परराज्यातील असुन पोलिस यंत्रणा मुग गिळुन गप्प का? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे जनतेला मिळालीच पाहिजेत असे आवाहन त्यांनी केले आहे.
अपघातग्रस्त झालेली एसटी मालवण आगारात असून आज रात्रीच्या वेळी त्या एसटीची मालवण शहरात किंवा अन्य तालुक्यात नेऊन डागडूजी करण्याची शक्यता आहे परंतु मनसेकडे अपघातग्रस्त एसटीचे फोटो असुन जर एसटी प्रशासनाने डंपरवर रितसर गुन्हा दाखल न केल्यास मनसेच्यावतीने एसटीच्या ‘एम डी’ यांच्याकडे तक्रार करणार असल्याचा इशारा मनसेच्या अमित इब्रामपूरकर यांनी दिला आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)