ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
सिंधुदुर्ग जिल्हा व्यवसाय शिक्षण अधिकारी रमण पाटील यांची "उपसंचालक" पदी बढती..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

सिंधुदुर्ग जिल्हा व्यवसाय शिक्षण अधिकारी रमण पाटील यांची "उपसंचालक" पदी बढती..!

प्रकाशन: 02 Oct 2022 04:32 PM
वाचन संख्या 136

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : सिंधुदुर्ग जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी श्री. रमण फकीर पाटील यांची “उपसंचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण, मुख्य कार्यालय, मुंबई” या पदावर पदोन्नती झाली आहे. श्री. रमण पाटील यांची “प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नाशिक” या पदावरुन बदली होऊन ते ०१ सप्टेंबर २०२० रोजी “जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी, सिंधुदुर्ग” या पदावर हजर झाले होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कार्यरत असताना त्यांच्या पदासह जिल्ह्यातील अतिरिक्त १२ आणि मुख्य कार्यालयातील एक अशा एकूण १४ पदांचा कार्यभार त्यांनी सक्षमपणे सांभाळला होता. त्यांच्या कारकिर्दीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय तसेच अशासकीय अनुदानित संस्थांमधील कर्मचाऱ्यांची सेवाविषयक आणि लेखाविषयक अनेक प्रलंबित कामे मार्गी लागली होती. त्यांच्या नेतृत्वाखाली प्रशिक्षण संस्थांमधील प्रवेशासाठी “Mission 100% Admission” राबवून ते यशस्वी केले आहे. आयटीआय मध्ये प्रवेश घेणाऱ्या दहावी किंवा बारावी अनुत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांना उत्तीर्ण होण्याची संधी देणारी “समकक्षता” योजना त्यांच्याच कालावधीत जिल्ह्यामध्ये सुरु झाली होती. जिल्ह्यातील संस्थांमध्ये प्रशिक्षण घेऊन उत्तीर्ण होणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांना रोजगार तसेच शिकाऊ उमेदवारीच्या संधी उपलब्ध होण्यासाठी औद्योगिक आस्थापनांची नोंदणी तसेच शिकाऊ उमेदवारीसाठी स्थित जागांची संख्याही त्यांच्या कारकिर्दीत वाढली होती.
प्रशासकीय गतीमानता आणि संपूर्ण पारर्शक कारभार ही त्यांच्या कामकाजाची खास वैशिष्ट्ये होती. कुशल मनुष्यबळासाठी संपूर्ण जगाचे लक्ष भारताकडे असून भारत देश जगात महासत्ता बनण्यासाठी, राज्यातील प्रशिक्षित कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी महत्तवपूर्ण योगदान देण्याबरोबरच शाश्वत विकास ध्येये पूर्ण करण्यासाठी जास्तीत
जास्त प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी प सांगितले आहे. रमण पाटील यांच्या नियुक्ती बद्दल शैक्षणिक क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.
फोटो: रमण पाटील

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स