ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
"संत गाडगेबाबा स्वछता अभियान " अंतर्गत कोकण विभागात प्रथम आलेल्या बापार्डे गावाला आमदार नितेश राणे यांची भेट..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

"संत गाडगेबाबा स्वछता अभियान " अंतर्गत कोकण विभागात प्रथम आलेल्या बापार्डे गावाला आमदार नितेश राणे यांची भेट..!

प्रकाशन: 02 Oct 2022 12:57 PM
वाचन संख्या 100

संतोष साळसकर | ब्युरोचीफ :
देवगड कणकवली मतदार संघाचे आमदार नितेशजी राणे यानी संत गाडगेबाबा स्वछता अभियान मधे कोकण विभागातुन प्रथम आलेल्या बापर्डे गावाला नुकतीच भेट देवून बापर्डे गावाने स्वछतेच्या बाबतीत गावात केलेल्या विशेष कामाची पाहणी करण्यात आली.
यावेळी गावात गांडूळखत प्रकल्प,बॉयोगॅस, शोषखड्ढे,गावातील रंगरंगोटी, गावातील सोलर सिस्टीम द्वारे सुरु असलेले स्ट्रीट लाइट व सर्वे सरकारी इमारती,,गावातील सर्व अंगणवाडी याचे रंगरंगोटी, पाऊस पाणी संकलन आणि इतर बऱ्याच कामाची प्रशंसा केली,व भविष्यात बापर्डे ग्रामपंचायत ला विकासात कोणत्याही प्रकारचा निधी कमी पडू देणार नाही याची ग्वाही दिली,यावेळी आमदार मा, नितेशजी राणे यांनी गावचे सरपंच,ग्रामसेवक,सर्व सद्यस्य तसेच गावातील सर्व शासकीय कर्मचारी याचे सत्कार केले.
बापर्डे गावात गेल्या दोन वर्षात जिल्हा नियोजन व 2515 व इतर निधीतून जवळपास 1 कोटी 30 लाख ची कामे आमदार याच्या प्रयत्नातून काही झालीत व काही मंजूर झाली याबद्दल गावाच्या वतीने सरपंच संजय लाड यांनी आमदार नितेश राणे यांचे आभार मानले.यावेळी व्यासपीठावर मंडळ अध्यक्ष अमोल तेली व संतोष किंजवडिकेर ,संदीप साटम,उत्तम बिर्जे,बड्या नारकर,सरपंच राजू जठार, अनघा राणे,अजित राणे,संदीप नाईकधुरे, संतोष नाईकधुरे, जीवन नाईकधुरे, बापूजी नाईकधुरे, तलाठी,मंडळ अधिकारी , ग्रामसेवक शिवराज राठोड व तेरसे ,ग्रामपंचायत सदस्य व गावातील इतर मान्यवर उपस्तीत होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स