ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
विजयदुर्ग ग्रामविकास मंडळ आयोजित घरगुती गणपती सजावट स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

विजयदुर्ग ग्रामविकास मंडळ आयोजित घरगुती गणपती सजावट स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव.

प्रकाशन: 28 Sep 2022 12:02 PM
वाचन संख्या 117

संतोष साळसकर | ब्युरोचीफ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातल्या विजयदुर्ग ग्रामविकास मंडळाने आयोजित केलेल्या गणेशोत्सव २०२२ घरगुती गणपती सजावट-आरास फोटो स्पर्धा यावर्षी विजयदुर्ग, रामेश्वर व गिर्ये या तीनही गावांसाठी आयोजित करण्यात आली होती.

विजयदुर्ग पंचक्रोशीतील स्पर्धकांनी मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या व उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेल्या या स्पर्धेचे शिस्तबद्ध व यशस्वीपणे आयोजन केले गेल्याने सर्व ग्रामस्थांकडुन विजयदुर्ग ग्रामविकास मंडळाचे कौतुक होत आहे. 

रामेश्वर, गिर्ये, विजयदुर्ग पंचक्रोशीतील विजेत्या ठरलेले स्पर्धक पुढिलप्रमाणे : विनायक चोडणेकर, नेहा महेश दळवी, शरयु संतोष गडकर, भालचंद्र श्रीधर तारकर, शैलेश रमेश पाटील ( सर्व विजयदुर्ग), अमित एकनाथ पुजारे, सिद्धेश नामदेव घाडी, दिलेश मधुकर देवळेकर, सौ पुर्वी शैलेश पुजारे, सचिन रमेश घारकर (सर्व रामेश्वर), सुरेश जनार्दन देवरुखकर, ओंकार उमाजी माळगावकर, प्रथमेश दिलीपकुमार सारंग, रोशन पुजारे, सतीश दुदवडकर (सर्व गिर्ये)

या स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांनी पत्रावळी, वारली पेन्टिग, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, नारी शक्ती जागर, रामेश्वर मंदिर प्रवेशद्वार, पर्यावरण पूरक संदेश देणारी उत्तमोत्तम सजावट केल्या होत्या.

घरगुती उत्कृष्ट गणपती सजावट-आरास फोटो स्पर्धेत सहभागी होऊन विजेता ठरलेल्या स्पर्धकांना पारितोषिक स्वरुपात विजयदुर्ग ग्रामविकास मंडळातर्फे श्रीफळ, गणराजाची प्रतिमा व सन्मानचिन्ह मंडळाचे सचिव सौ योगिता परुळेकर, मुख्य सल्लागार राजेंद्र परुळेकर, उपाध्यक्ष चंद्रकांत बिडये, सहसचिव दिपांजली तळेकर, 
सदस्य विनायक चोडणेकर, सौ विद्या गवाणकर, सौ छाया पटेल, श्रीमती स्वप्ना केळकर, भुमिका धुळप तसेच गिर्ये ग्रामपंचायत सरपंच रुपेश गिरकर, रामेश्वर ग्रामपंचायत सरपंच विनोद सुके यांच्याहस्ते देऊन गौरविण्यात आले.

विजयदुर्ग ग्रामविकास मंडळाच्या वतीने ह्या स्पर्धेत सहभागी झालेल्या व विजेत्या सर्व स्पर्धकांचे अभिनंदन करुन हि स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मेहनत घेणाऱ्या मंडळाच्या गाव व मुंबईच्या सर्व सदस्य, पदाधिकारी व सहकार्य करणाऱ्या ग्रामस्थांचे आभार मानण्यात आले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स