ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
व्हाळावरील साकवाच्या लोखंडी प्लेटस् चोरण्याचा अजब प्रकार..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

व्हाळावरील साकवाच्या लोखंडी प्लेटस् चोरण्याचा अजब प्रकार..!

प्रकाशन: 28 Sep 2022 11:14 AM
वाचन संख्या 92

कणकवली | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध तालुक्यात सध्या अज्ञात चोरट्यांनी बंद फ्लॅटस्, देवळातील फंडपेट्या या नंतर आता सार्वजनिक मालमत्तेवर डोळा ठेवून चोरीचे डाव आखले आहेत.
अशाच एका अज्ञात चोरट्याने लोरे नं. १ येथील गव्हाळी व्हाळवरच्या लोखंडी साकवाच्या १० हजार रुपये किमतीच्या ७ लोखंडी प्लेट्स अज्ञात चोरट्यानी लंपास केल्या आहेत.
ही गोष्ट २० सप्टेंबरला निदर्शनाला आल्यानंतर
याबाबतची तक्रार कणकवली पोलीस ठाण्यात जिल्हा परीषद बांधकाम उपविभाग कणकवली येथिल कनिष्ठ अभियंता वर्षाराणी जाधव यांनी नोंदविली आहे. पोलिसांनी या घटनेबाबत अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाने लोरे गव्हाळी व्हाळावर मार्च १९८७ मध्ये लोखंडी साकव बांधला होता. हा साकव जिल्हा परिषद उपविभागाकडे २८ मे १९८७ रोजी देखभाल व दुरुस्ती कामी हस्तांतरीत केला गेला होता. या साकवाच्या लोंखडी साहित्याची चोरी झाल्याची माहिती ग्रामसेवक ऋतुराज कदम यांनी सौ. जाधव यांना दिली. त्यानंतर शाखा अभियंता श्री. सुतार यांच्यासह लोरेत जाऊन सरपंच अजय रावराणे यांच्यासह घटनास्थळी पाहणी करण्यात आली. यावेळी साकवावरच्या ७ लोखंडी प्लेट आढळल्या नाहीत. प्लेटस चोरीस गेल्याची खात्री झाल्यानंतर पोलिसांत फिर्याद दाखल करण्यात आली. या घटनेचा अधिक तपास कणकवली पोलीस करत आहेत.

(फोटो प्रातिनिधिक: गुगल)

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स