ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
"बुलाती है, मगर जाने का नही……!"
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

"बुलाती है, मगर जाने का नही……!"

प्रकाशन: 28 Sep 2022 10:51 AM
वाचन संख्या 234

विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट : “एखाद्या असहाय्य स्त्रीचा, मुलीचा कळकळीने फोन किंवा सेलफोनवर संदेश येतो आणि ती व्हिडिओ काॅल करायला भाग पाडते आणि प्रत्यक्षात तो एखादी पाॅर्न साईट किंवा ब्लॅकमेलिंगचा एखादा अश्लील खेळ ठरतो..” अशी उदाहरणे सध्या वाढत आहेत. महिलेच्या आवाजामागे प्रत्यक्षात एखादा भुरटा पुरुषही असतो अशी मनःस्ताप देणारी सॉफ्टवेअर्स निर्माण होत आहेत.
या सर्व ऑनलाईन फसवणुकीचा पौगंडावस्थेतील युवा पिढी आणि अगदी निवृत्त ज्येष्ठ नागरीकांनाही फटका बसत आहे.
याबद्दल नुकतेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आचरा पोलिस ठाण्यातर्फे एक जागृती आवाहन करण्यात आले आहे.

आचरा पोलीस स्टेशन तर्फे नागरीकांना आवाहन करताना म्हणले आहे की सायबर गुन्हेगारांकडून ऑनलाईन फसवणूकीबाबत नवनवीन फंडे वापरले जात असून यात जास्त करून तरुण पिढी फसली जात असल्याचे दिसून येत आहे. आचरा भागात असे प्रकार वाढले असून अनोळखी नंबर,फोन कॉल पासून सावध रहावे.
आचरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील यांनी आवाहन करताना सांगितले की सायबर गु्हेगारांकडून ऑनलाईन आर्थिक फसवणूकीसाठी नवनवीन क्लुप्त्या वापरल्या जात आहेत. यात फोन करुन एखाद्या असहाय्य स्त्री चा आव आणून आर्थिक मदत पाहिजे म्हणून सांगून व्हिडिओ कॉल करण्यास सागून फसविणे, सहज सुलभ ऑनलाईन कर्ज तात्काळ मंजूर करुन देण्याच्या लोन अपचा फंडा वापरुन गंडा घालणे, वीजबिल थकित असल्याचा बहाणा करुन फसवणे, फेसबूक, इन्स्टाग्रामवर अज्ञात महिलेकडून येणारी फ्रेंड रिक्वेस्ट, नोकरीचा बहाणा आदी बहाण्याने फसवणूकीचे प्रकार वाढले आहेत. याबाबत प्रत्येकाने सावधगिरी बाळगत अनोळखी नंबर वरुन येणारे फोन कॉल उचलू नयेत, तसेच आपला युपीआय पीनकोड कोणालाही देऊ नये, प्रत्यक्ष वा सुरक्षित आर्थिक व्यवहारावर भर द्या, व्हॉट्सअप वा इमेलवरुन आलेली कोणतीही लिंक ओपन करू नये यातून आपली फसवणूक होवू शकते या दृष्टीने सर्वांनी सावधगिरी बाळगावी.

थोडक्यात कुठल्याही ऑनलाईन मोहाची संधी जरी आली तरी सर्वांनी सावधपणे सतर्क राहून त्या संधीबद्दल सावध राहून इतकेच लक्षात ठेवावे की ” वो बुलाती है…मगर जाने का नही…!”

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 449

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स