ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
पर्यटन विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध पर्यटन मंत्री श्री. मंगल प्रभात लोंढा यांचे पर्यटन महासंघास अभिवचन…..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

पर्यटन विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध पर्यटन मंत्री श्री. मंगल प्रभात लोंढा यांचे पर्यटन महासंघास अभिवचन…..!

प्रकाशन: 26 Sep 2022 04:54 PM
वाचन संख्या 57

सी वर्ल्ड प्रोजेक्ट उभारणीसाठी राज्य सरकार सकारात्मक- बाबा मोंडकर.

विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट
कोकणच्या पर्यटन वाढीसाठी पर्यटन मंत्री श्री. मंगल प्रभात लोढा यांची भाजपा मुख्य प्रवक्ते माधवजी भंडारी यांच्या माध्यमातून भेट घेण्यात आली पर्यटन मंत्री महोदय यांनी कोकणाच्या शाश्वत नियोजन साठी माधवराव भंडारी साहेब यांचे मार्गदर्शनाखाली पर्यटन महासंघाने काम करण्याचे सूचित केले. पर्यटन वाढीसाठी पर्यटन महासंघा तर्फे व्यापार व पर्यटन वाढीसाठी राबवत असलेल्या उपक्रमाची माहिती मंत्री महोदय यांना देण्यात आली कोरोना नंतर कोकणात पर्यटन व्यवसाय पूर्वपदावर येण्याची प्रतीक्षा कोकणातील व्यावसायिक करत असताना पर्यटन व्यवसाय वाढीसाठी राज्य सरकारने व्यावसायिकांच्या मदतीसाठी एक आश्वासक पाऊल उचलण्याची गरज असल्याची भूमिका महासंघाने व्यक्त केली आज कोकण प्रांतात बीच टुरिझम सोबत अँग्रो, कल्चर, मेडिकल, फूड, हिस्ट्री क्षेत्रात काम होणे गरजेचे असून पर्यटन खात्यामार्फत न्याहरी निवास धारक, हॉटेल, व्यापारी वर्गासाठी आवश्यक त्या सोयी सुविधा निर्माण करण्याची गरज आहे कोकण आंतराष्ट्रीय पर्यटन स्थळ म्हणून विकसित होण्यासाठी काही ग्लोबल प्रोजेक्टची आवश्यक्यता आहे अशी विनंती महासंघा तर्फे करण्यात आली त्या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रलंबित सिवल्ड प्रकल्प होण्याविषयी मंत्री महोदया सोबत सकारात्मक चर्चा करण्यात आली त्यावेळी मंत्री महोदयांनी स्थानिक जमीन मालक प्रकल्पासाठी सकारात्मक असतील तर मार्ग निच्छित निघेल असे आश्वासन दिले यावेळी कोकणातल्या पर्यटन वाढीसाठी आवश्यक मागण्याचे निवेदन मंत्री महोदय यांना देण्यात आले. लवकरच कोकणातील पर्यटन समस्या जाणून घेण्यासाठी कोकण दोऱ्यावर यायचे त्यांनी मान्य केले तसेच कोकणच्या शाश्वत पर्यटन विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे मंत्री महोदय यांनी स्पष्ट केले. यावेळी भाजपा मुख्य प्रवक्ते माधवजी भंडारी हे उपस्थित होते अशी माहिती बाबा मोंडकर अध्यक्ष पर्यटन व्यावसायिक महासंघ यांनी दिली.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स