ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या ऑक्सिजन प्लांट चे ५ सप्टेंबर रोजी होणार लोकार्पण

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या ऑक्सिजन प्लांट चे ५ सप्टेंबर रोजी होणार लोकार्पण

प्रकाशन: 02 Sep 2021 05:37 PM
वाचन संख्या 160

प्राथ.शिक्षक समितीच्या सिंधुदुर्ग शाखेचा उपक्रम अवघ्या देशाला अनुकरणीय

प्रतिमिनीट ३३३ लिटर होणार ऑक्सिजननिर्मिती

उमेश परब / कणकवली : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने कणकवली उपजिल्हा रुग्णालय येथे उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन प्लांट चे राष्ट्रीय शिक्षक दिनी ५ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता लोकार्पण करण्यात येणार आहे. संघटनेचे राज्याध्यक्ष उदय शिंदे यांच्या हस्ते या ऑक्सिजन प्लांट चे उदघाटन होणार असल्याची माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष नितीन कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली. या ऑक्सिजन प्लांटमध्ये ३३३ लिटर प्रतिमिनीट ऑक्सिजन निर्मिती होणार आहे. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांना आवश्यक ऑक्सिजन तात्काळ उपलब्ध होणार आहे. एप्रिल २०२१ च्या दरम्यान सिंधुदुर्गात कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजन ची कमतरता भासत होती. जिल्ह्यात कोरोना रोगामुळे रुग्ण दगावलेच परंतु ऑक्सिजन चा पुरवठा वेळेत न झाल्यामुळेही हार्ट अटॅक ने रुग्ण दगावले आहेत. यासाठी जिल्ह्यात ऑक्सिजन निर्मिती करणारा ऑक्सिजन प्लांट उभारण्याचा निर्णय एकमुखाने संघटनेच्या बैठकीत घेण्यात आला होता . ३० मे २०२१ अखेर यासाठी ४६ लाख रुपयांचा निधी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा सिंधुदुर्गच्या शिक्षक सदस्यांच्या वतीने उभारण्यात आला आहे. जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या अनुमतीनंतर कणकवली उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आला आहे. ऑक्सिजन प्लांट उभारणी करण्यासाठी लागणारी आरमाडा केबल दिव-दमण येथून आणण्यात आली आहे. ऑक्सिजन प्लांट चे टेस्टिंग गुजरातमध्ये करण्यात आले आहे. टेस्टिंग क्वालिटी ९०% ते ९६% दरम्यान असावी लागते. शिक्षक समितीने उभारलेल्या ऑक्सिजन प्लांट चा टेस्ट रिपोर्ट तेवढा आहे. या प्लान्टसाठी स्वतंत्र शेड उभारण्यात आली असून,रुग्णांसाठी स्वतंत्र ३३ खाटांचा कक्षही उभारण्यात आला आहे अशी माहिती कदम यांनी दिली. यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक समितीचे राज्य उपाध्यक्ष राजन कोरगावकर, जिल्हा सचिव सचिन मदने, राज्य सहसचिव नामदेव जांभवडेकर जेष्ठ मार्गदर्शक भाई चव्हाण, जिल्हा कार्याध्यक्ष नारायण नाईक, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रसेन पाताडे, जिल्हा संघटक श्रीकृष्ण कांबळी, कणकवली शाखा पदाधिकारी श्रीकृष्ण ठाणेकर आदी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स