ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
जागतिक किडनी दिनानिमित्त मार्गदर्शन व तपासणी.

जागतिक किडनी दिनानिमित्त मार्गदर्शन व तपासणी.

प्रकाशन: 21 Sep 2022 10:44 AM
वाचन संख्या 40

ओरोस | प्रतिनिधी : जागतिक किडनी दिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालय ( ओरोस, सिंधुदुर्गनगरी) येथे २१ सप्टेंबरला सकाळी ११ वाजता जागतिक किडनी दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये किडनीच्या रुग्णांकरिता तज्ज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन व तपासणी कार्यक्रम आयोजित करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.
आधुनीक युगात सर्वत्र तरुण वयातील व्यक्तींमध्ये किडनीचे आजार होण्याचे प्रमाण वाढलेले आहे. तसेच वय झालेल्या व्यक्तींमध्येदेखील रक्तदाब, मधुमेह, इतर गंभीर आजार असतात. त्यामुळे किडनीचे आजार होत आहेत. या आजारावर किडनी बदलणे व किडनी डायलेसिस औषधोपचार केले जातात. या आजारासाठी जागतिक किडनी दिन सर्वत्र राबविण्यात येतो. यानिमित्त २१ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा रुग्णालयाच्या आनंदीबाई जोशी सभागृहामध्ये किडनीच्या रुग्णांकरिता तज्ज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन व तपासणी कार्यक्रम आयोजित केले आहेत. त्याकरिता इच्छूक किडनीच्या आजाराचे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी उपस्थित राहवे. तसेच सिंधुदुर्ग जिल्हा केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट असोसिएशनच्या प्रतिनिधींनीही उपस्थित राहवे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स