ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
डी. पी. प्लॅन कमिटीत विरोधी व्यक्तींना पण स्थान देणार ; नगराध्यक्ष समीर नलावडेंची मोठी घोषणा.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

डी. पी. प्लॅन कमिटीत विरोधी व्यक्तींना पण स्थान देणार ; नगराध्यक्ष समीर नलावडेंची मोठी घोषणा.

प्रकाशन: 20 Sep 2022 06:28 PM
वाचन संख्या 32

विरोधी गटनेता सुशांत नाईक अथवा नगरसेवक कन्हैया पारकर यांना देखील स्थान दिले जाणार..?

विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली शहराच्या प्रस्तावीत शहर तथा नगर विकास आराखडयाबाबत आज नगरपंचायत सभागृहात झालेल्या बैठकीत नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी डी. पी. प्लॅन कमिटीत विरोधी गटनेता सुशांत नाईक अथवा नगरसेवक कन्हैया पारकर यांना देखील स्थान दिले जाईल असे सांगत मनाचा मोठेपणा दाखवला. कणकवली शहर विकास आराखड्याबाबत सहाय्यक नगरचनाकार देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या अध्यक्षतेखाली आज नगरपंचायत सभागृहात बैठक झाली.

‘डी पी प्लॅन’ कमिटीमध्ये नियमानुसार स्टँडिंग कमिटी चे सत्ताधारी ३ सदस्य असतात. मात्र नियमांच्या पलीकडे जात शहर विकासाचा आरखडा असल्यामुळे नगरपंचायतमध्ये सत्तेत मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक अबिद नाईक आणि विरोधी नगरसेवकही या कमिटीत असावे यासाठी नगराध्यक्ष नलावडे यांनी विरोधी नगरसेवकांना आपला प्रतिनिधी देण्याबाबत सूचना केली.
या बैठकीला मुख्याधिकारी अवधूत तावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, सत्ताधारी गटनेता तथा आरोग्य सभापती संजय कामतेकर, बांधकाम सभापती ऍड. विराज भोसले, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अबिद नाईक नगरसेवक अभि मुसळे, विरोधी गटनेता सुशांत नाईक, कन्हैया पारकर, रुपेश नार्वेकर, मेघा गांगण, उर्वी, कविता राणे, मानसी मुंज, माही परुळेकर, माजी उपनगराध्यक्ष किशोर राणे आदी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स