ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
अनुरुद्र नारकर यांची जोगेश्वरी विधानसभा व्यापार विभाग संघटक पदी नियुक्ती

अनुरुद्र नारकर यांची जोगेश्वरी विधानसभा व्यापार विभाग संघटक पदी नियुक्ती

प्रकाशन: 01 Sep 2021 02:50 PM
वाचन संख्या 336

अनुरुद्र नारकर हे फणसगावचे सुपुत्र,समाजसेवक,उद्योगपती

संतोष साळसकर / शिरगाव : देवगड तालुक्यातील फणसगावचे सुपुत्र, फणसगाव पंचक्रोशी शिक्षण संस्था(मुंबई)चे अध्यक्ष तथा देवगड तालुका शिवसेना संपर्कप्रमुख,समाजसेवक,उद्योगपती अनुरुद्र विठ्ठल नारकर यांची मुंबई जोगेश्वरी विधानसभा व्यापार विभाग संघटक पदी नियुक्ती करण्यात आली.
स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कडवट विचारांचे ते पाईक आहेत.अनुरुद्र नारकर हे कट्टर शिवसैनिक आहेत.पक्षप्रमुख,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विचारांचा नारकर यांच्यावर पगडा आहे.कडवट शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख आहे.
शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार,शिवसेना नेते खासदार गजानन कीर्तिकर यांच्या सूचनेनुसार,माजी राज्यमंत्री रवींद्र वायकर यांच्या मार्गदर्शनानुसार व आमदार सुनील प्रभू यांच्या नेतृत्वाखाली अनुरुद्र नारकर यांची ही निवड करण्यात आली आहे.
या निवडीनंतर अनुरुद्र नारकर यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले.त्यांच्या या निवडीनंतर फणसगाव परिसरातून विशेष अभिनंदन करण्यात येत आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स