शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्या हस्ते पांडुरंग कोचरेकर यांना गुरुसेवा पुरस्कार प्रदान…..!
विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट :
आचरा येथील कै. बा. ना. बिडये विद्यामंदिर केंद्रशाळा नं१ चे पदवीधर प्राथमिक शिक्षक पांडुरंग गुरुदास कोचरेकर यांना महाराष्ट्राचे शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्या हस्ते गुरुसेवा पुरस्कार सावंतवाडी येथे प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार काही दिवसांपूर्वी दिपक केसरकर मित्रमंडळाकडून त्यांना जाहिर झाला होता. शैक्षणिक कार्यासोबत साने गुरुजी कथामाला, कोकण मराठी साहित्य परिषद आदी अनेक सामाजिक संस्थामध्ये कोचरेकर यांचे योगदान मोलाचे आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)