ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
पुणे येथे १८ सप्टेंबरला 'गुरूजन गौरव सोहळा..!!'

पुणे येथे १८ सप्टेंबरला 'गुरूजन गौरव सोहळा..!!'

प्रकाशन: 11 Sep 2022 12:08 PM
वाचन संख्या 277

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील ओरोस बुद्रुक नं. १ या प्राथमिक प्रशालेच्या उपक्रमशील शिक्षिका रिया आळवेकर यांची निवड…!

संतोष साळसकर | ब्युरोचीफ :
वृंदावन फाऊंडेशन – विवेक व्यासपीठ, पुणे आयोजित गुरुजन गौरव सोहळा २०२१ – २२ रविवारी दिनांक १८ सप्टेंबरला सकाळी १० वाजता डेक्कन एज्युकेशन सोसायटी, प्रशासकीय भवन,ज्ञानेश्वर पादुका चौक,एफ.सी.रोड पुणे येथे डॉ. अर्चना कुडतरकर (का. संपादिका, शिक्षण विवेक) यांच्या शुभ हस्ते तसेच ह.भ.प. शिवाजीराव मोरे महाराज (जगद्गुरु संत तुकोबाराय यांचे वंशज) यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. सुनिल गायकवाड (मा खासदार लातूर) असून श्री गायकवाड यांनी देश विदेशातून १७ पदव्या संपादन केलेल्या आहेत.


यावेळी प्रमुख पाहुणे डॉ. सुभाष चव्हाण (संचालक, एस.एन.डी.टी महिला विद्यापीठ मुंबई) सोमनाथ लांडगे (शैक्षणिक, सामाजिक चळवळीतील कृतीशील कार्यकर्ते) असून यावेळी पुरस्कार प्राप्त गुरुजन डॉ. प्रभाकर चव्हाण, राजेश डोमळे, संतोष आगलावे, श्री. व सौ. रोहिणी – दिलीप सोनकवडे, महादेव यादव, सौ. रेखा जेवळीकर, संपतराव देशमुख, तात्याबा कांबळे, सौ. पुनम गुजर, प्रो. डॅनियल पेणकर, रिया आळवेकर, एकनाथ चव्हाण, अमोल शिंदे, दिपक धामापूरकर, शंकर चौधरी यांचा सत्कार होणार आहे.तरी या सोहळ्याला सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन अर्चना खंडागळे , अमेय महाजन देवीदास बिनवडे, अलका सपकाळ यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स