सुख शांती मंडळाची नूतन कार्यकारणी जाहीर..!
सुख शांती मंडळाच्या अध्यक्षपदी अमित रावले , सचिवपदी राजेंद्र साटम व खजिनदारपदी किशोर रावले यांची बिनविरोध निवड..!
संतोष साळसकर | ब्युरोचीफ :
देवगड तालुक्यातील साळशी – सरमळे वाडी येथील सुख शांती मंडळाच्या सर्वसाधारण सभेत मंडळाच्या नूतन कार्यकारणीची निवड करण्यात आली यामध्ये मंडळाचे अध्यक्षपदी अमित रावले , सचिवपदी राजेंद्र साटम यांची फेरनिवड तसेच खजिनदारपदी किशोर रावले यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
सुख शांती मंडळाचीे वार्षिक सर्वसाधारण सभा मंडळाचे अध्यक्ष अशोक कदम यांच्या अध्यक्षखाली संपन्न झाली. यावेळी मंडळाच्या नूतन कार्यकारणाची बिनविरोध निवड करण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी अमित रावले सचिवपदी राजेंद्र साटम खजिनदारपदी किशोर रावले व कार्यकारी सदस्य म्हणून साईराम लाड हर्षल रावले चेतन कदम आणि वैष्णव कदम यांची निवड करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी नूतन कार्यकारिणी पदाधिकारी व सदस्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी सर्वांच्या सहकार्यातून सहभागातून वाडीच्या विकासात्मक कामे करण्यात येतील असे नूतन पदाधिकारी सांगितले.
या सभेस मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)