ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
लेखनाचा वाहता निर्झर म्हणजे 'आनंद विष्णू शेमडकर..!'

लेखनाचा वाहता निर्झर म्हणजे 'आनंद विष्णू शेमडकर..!'

प्रकाशन: 10 Sep 2022 09:25 AM
वाचन संख्या 479

इझी डिजी ( सदर ) | भाग : १

मालवण | सुयोग पंडित : आपल्या जीवनामध्ये खूप काही सुप्त आहे हे जाणताना जगातील प्रत्येक सजीव आणि निर्जिवामध्ये काहीतरी ख़ास आहे हा विश्वास ठेवून त्यांना कल्पनाशक्तीने बोलते करु शकणारे सहज लेखनातील एक नांव म्हणजे आनंद विष्णू शेमडकर.
अमूक एका विषयांतच गुरफटवून घेऊन किंवा स्वतःची शैली विकसीत करण्याचा ध्यास ठेवून लेखन न करता निव्वळ स्वतःला जसे भावते तसे अस्सल शब्दांमध्ये मांडणे ही आनंद यांच्या लेखनातील ठळक बाजू आहे. कच्चेपणा म्हणजे अर्धकच्चेपणा नसतो तर तो कृत्रिम पापुद्र्यांशिवाय मांडलेला निर्भेळपणा असतो हे आनंद यांचे छोटे व दीर्घ ललित लेखन, विविध पोस्टवरील भाष्य आणि त्यांच्या सहज उद्गारांतून स्पष्ट होते. ‘काहीही हां..’, किंवा वरवर बालीश असे वाटणारे विचार खरेतर अस्सल व उत्स्फूर्तपणे आलेले असतात आणि त्यांना निर्भिडपणे मांडायची ताकद आनंद विष्णू शेमडकर यांच्यात आहे.

त्यांची सामाजिक स्तरावर थेट सहभाग घ्यायची वृत्ती त्यांना निसर्ग,सिनेमा,खेळ,जीवन,पशूपक्षी,खाद्यपदार्थ,संगीत,मानवी वृत्ती, आणि इतर सर्वच घटकांवर खळाळून लेखन करायला उद्युक्त करतात आणि ते प्रांजळपणे उद्युक्त होतात. सोबत स्वरचित मिम्स तथा व्यंगचित्रे तयार करुन ते उपहास,स्वगत अशा विविध कल्पनांनाही सादर करतात.

आनंद विष्णू शेमडकर यांच्या खळाळामध्येही अनुभवांच्या अभ्यासाची विद्वत्ता आहे. ती विद्वत्ता साधेपणाने स्विकारून लेखनामध्ये तिला बढ़ेजावाने न आणता ते सादर होतात म्हणून ते लेखनाचा निर्झर ठरतात.
‘इझी डिजी’ म्हणजे डिजीटल मंचावर सहज लेखन करणार्या आनंद विष्णू शेमडकर यांना त्यांच्या सहज निर्झर लेखन व त्यांचे वाचक ही संख्या न रहाता ती एक ‘आनंदजत्रा’ असते.

आपली आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स