आज मालवणात 'तियात्र..!'
मामा वरेरकर नाट्यगृह येथे रात्री 09:30 वाजता आयोजीत कोंकणी नाटक.
मालवण | सुयोग पंडित: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या सुप्रसिद्ध मामा वरेरकर नाट्यगृहात आज रात्री 09:30 ‘दोयाळ’ हे तुफान विनोदी कोंकणी नाटक म्हणजेच ‘तियात्र’ सादर होणार आहे.
देवबाग गावातर्फे आयोजीत होणार्या या नाटकात ‘जाॅन डिसिल्वा समूह,मडगांव,गोवा’ या समूहाचे कसलेले अभिनेते व अभिनेत्री कलाकार सहभाग घेत आहेत.
‘मदर मेरी’ च्या सणाचे औचित्य साधून या तियात्राचे आयोजन करण्यात आले आहे.
या नाटकाचे तिकिटदर 100,150 व http://localhost/news/public/uploads/200 असे वाजवी ठेवले गेले आहेत.
याबाबत अधिक माहितीसाठी कॅलीस 7798384023 व जेम्स 7498016667 यांना संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या तियात्राचा मोठ्या संख्येने आस्वाद घेण्याचेही आवाहन आयोजकांनी केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)