ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
पर्यटन व्यावसायीक महासंघाचे वेंगुर्ले तालुक्यात बैठकीचे आयोजन.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

पर्यटन व्यावसायीक महासंघाचे वेंगुर्ले तालुक्यात बैठकीचे आयोजन.

प्रकाशन: 09 Sep 2022 02:49 PM
वाचन संख्या 51

पर्यटन व्यावसायिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी महत्त्वाचे पाऊल.

विवेक परब/ एडिटोरिअल असिस्टंट : सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यावसायीक महासंघाच्या वतीने जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या व्यावसायीकांना संघटीत करून त्यांच्या व्यवसाय वाढीसाठी संघटीत पणे प्रयत्न केले जात आहेत. व्यापारी व पर्यटन क्षेत्रातील व्यवसायीकांना व्यवसायात येणाऱ्या शासकीय व अन्य अडचणी सोडविण्यासाठी पर्यटन महासंघ कार्य करीत असुन, वेंगुर्ले तालुक्यातील पर्यटन व्यवसायीकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष श्री विष्णु उर्फ बाबा मोंडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवार दिनांक ११ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ = ०० वाजता साईमंगल कार्यालय, सुंदरभाटले – वेंगुर्ले येथे बैठकीचे आयोजन केले आहे.
वेंगुर्ले तालुक्यातील निवास न्याहारी योजनेचे व्यावसायिक, हाॅटेल व्यवसायीक, जल क्रीडा व्यवसायीक, रिसाॅर्ट मालक, सहल आयोजक, ट्रॅव्हल एजंट, तंबु निवास व्यवसायीक , होम स्टे व्यवसायीक, अँग्रोटुरीझम व्यवसायीक, गाईड इत्यादींनी या बैठकीस उपस्थित रहावे, असे आवाहन पर्यटन व्यवसायीक महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळु देसाई व महेश सामंत ( भोगवे ) यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स