वायरीतील केळबाई मंदिर परिसरात मिनी हाइमास्ट लाइट टाॅवर.
मालवण | सुयोग पंडित : मालवण शहरातील केळबाई मंदिर परिसरातील नागरीक व केळबाई वाडीतील नागरिकांच्या केळबाई मंदिरानजिक मिनी हाइमास्ट उभारण्याची मागणी होती.
या मागणीची दखल घेऊन कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक साहेब यांच्या विशेष निधीमधून आणि माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर , शिवसेना तालुका प्रमुख हरी खोबरेकर, माजी नगरसेविका तृप्ती मयेकर, माजी नगरसेविका सेजल परब, माजी नगरसेवक पंकज सादये, युवासेना नेते तपस्वी मयेकर यांच्या प्रयत्नांतून साकार झालेला मिनी हाइमास्ट प्रकाशीत झाला आहे.
या मुळे केळबाई वाडीतील नागरिक व केळलबाई मंदिर मंडळ यांनी या सोयीबद्दल समाधान व्यक्त केल्याचे समजते.
या प्रकल्पाविषयी बोलताना युवानेते तपस्वी मयेकर यांनी आमदार वैभव नाईक, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर व त्यांचे सहकारी माजी नगरसेवक ,शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांचे विशेष आभार मानले आहेत आणि श्री देवी केळबाई देवीच्या आशीर्वादाने भविष्यात या परिसरातील विकासकामे प्राधान्याने करण्याचा प्रयत्न करु असे प्रतिपादन केले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)