आमदार वैभव नाईक यांनी घेतली शिवसेना उपनेते व सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांची भेट.
संतोष साळसकर | ब्युरोचीफ : कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनी आज शिवसेना उपनेते, सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्या देवगड तालुक्यातील बुरंबवडे येथील निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली.
आमदार वैभव नाईक यांनी भेट देऊन त्यांच्या श्री.गणेश मूर्तीचे दर्शन घेतले.
सिंधुदुर्ग जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांची शिवसेना उपनेते पदी निवड झाल्याबद्दल आ. वैभव नाईक यांनी शाल श्रीफळ देऊन त्यांचा विशेष सत्कार केला.
यावेळी अनेक शिवसेना पदाधिकारी व स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)