अण्णासाहेब देसाई विद्यामंदिर परुळेचे NMMS शिष्यवृत्ती परीक्षेत यश..!
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
जून २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दृष्ट्या मागास शिष्यवृत्ती (एन.एम.एम .एस) परीक्षेत विद्याप्रसारक विश्वस्त मंडळ परुळे संचलित, अण्णासाहेब देसाई विद्यामंदिर परुळेचे (तालुका वेंगुर्ले) ६ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन एका विद्यार्थिनीची शिष्यवृत्तीसाठी निवड झाली.
कु. दिक्षा शंकर परब हिने सर्वसाधारण गुणवत्ता यादीत जिल्ह्यात ३४ वा क्रमांक मिळविला. दिक्षाला महिन्याला एक हजार रुपये प्रमाणे नववी ते बारावी पर्यंत प्रत्येकी एकूण ४८ हजार रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार असून तिच्या पुढील शिक्षणाला हातभार लागणार आहे.
यशस्वी विद्यार्थी, पालक व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन संस्था पदाधिकारी, मुख्याध्यापक, पालक व ग्रामस्थ यांनी केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)