लाडक्या बाप्पाचे उद्या होणार वाजतगाजत आगमन.
कोरोना नंतरचा यंदाचा गणेशोत्सव भाविकांसाठी आनंददायी
संतोष साळसकर / ब्युरोचीफ : आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन बुधवारी होत आहे. काहीजण आदल्यादिवशीच बाप्पांना घरी आणतात. त्यामुळे जिल्ह्यातील गणेश भक्तांची लगबग सुरू आहे. त्यात गणेश मूर्तिकारही आपल्या मूर्तीवर शेवटचा रंगकाम करून ग्राहकांना सेवा देत आहेत.गेले काही दिवस पर्जन्यराजानेही थोडी विश्रांती घेतल्याने गणेशभक्त थोडे सुखावले आहेत. आज मंगळवार सर्व गणेश भक्त आपल्या लाडक्या बाप्पाचे उद्या आगमन होणार यासाठी बाप्पांचे आरास, डेकोरेशन सजावट, मंडपी सजावट यात गुंतला आहे. चाकरमानी देखील गावात दाखल झालेत. कोरोना नंतर चा यंदाचा गणेशोत्सव सर्व गणेशभक्तांना खूपच आनंदीदायक ठरला आहे.
कणकवली तालुक्यातील नांदगाव येथील गणेश मूर्तिकार नागेश मेस्त्री आणि गणेश मेस्त्री या दोन बंधूंनी स्वतः दुसऱ्या शाळेत गणेशमूर्ती कला व रंगकाम शिकून ९ वर्षापूर्वी नांदगाव येथील वाघाची वाडी येथे गणेश मूर्ती शाळा सुरू केली. आणि आज ते खूप यशस्वी रित्या चित्रशाळा चालवत आहेत.
लोकांना त्यांची गणेश मूर्ती कला आणि रंगकाम खूप आवडते त्यामुळे दरवर्षी त्यांच्याकडे गणपती मूर्ती ची मागणी वाढत आहे.आणि या दोन भावांची कला खूप नाविन्य जोगी आहे. उत्कृष्ट मूर्ती कला आणि रंगकाम यात हे बंधू निपुण आहेत. सध्या इक्को फ्रेंडली ही पर्यावरण पूरक गणेश मूर्ती सर्वांना आवडते. त्या मूर्ती ते सुबक बनवितात. मात्र काहीजण प्लॅस्टर ऑफ पॅरिस च्या मूर्तीची मागणी करतात ती सुद्धा ते ग्राहकांच्या मागणीनुसार मूर्ती मागउन घेतात. मात्र त्यांच्याकडे शाडो मातीच्या गणेश मूर्ती ची संख्या खूप आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)