मठ बुद्रुक वि.का.स.सेवा सोसायटी चेअरमन पदी सतिश उर्फ राजु परुळेकर बिनविरोध...!
विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मठ बुद्रुक विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी चेअरमन पदी सतिश उर्फ राजु परुळेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी बोलताना परुळेकर म्हणाले की सहका-यांना सोबत घेऊन सहकाराच्या माध्यमातून गावाच्या विकासासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करु.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून निबंधक श्री अजय हिर्लेकर यांनी काम पाहिले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य अनंत राऊत, जनार्दन सावंत, बाळा यरम, मोहन येरम, गुरुदेव केळुसकर, बाबा घाडी, गुणाजी बागवे, भानुदास गायकवाड, उमाजी मालप, अशोक कांदळकर, निकिता चव्हाण, सौ. पाताडे, सचिव कदम, कांदळगावकर व सभासद मंडळी उपस्थित होती.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)