ह्युमन राईट असोसिएशन फाॅर प्रोटेक्शनच्या वतीने प्रशासकीय अधिकारी श्री. अरूण फोंडेकर यांचा सेवानिवृत्तपर सत्कार.
विवेक परब | एडिटोरिअल असिंस्टट : प्रशासकीय अधिकारी श्री. अरुण महादेव फोंडेकर हे नियमित सेवानिवृत्त झाले त्या अनुषंगाने उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सिंधुदुर्ग येथे त्यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा आयोजित केला होता.
या सत्कार समारंभात ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे कोकण विभागीय अध्यक्ष तसेच कोकण विभाग रिक्षा- टॅक्सी महासंघाचे कार्याध्यक्ष संतोष नाईक, कोकण विभाग रिक्षा- टॅक्सी महासंघाचे सहसचिव व सिंधुदुर्ग जिल्हा रिक्षा संघटनेचे सचिव सुधीर पराडकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्याचप्रमाणे श्री अरुण फोंडेकर यांचा सत्कार कोकण विभागीय रिक्षा टॅक्सी महासंघ व सिंधुदुर्ग जिल्हा रिक्षा संघटना, ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या वतीने करण्यात आला.
यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकुमार काळे, कदम साहेब, श्री. व सौ. अरुण फोंडेकर, ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन चे जिल्हाध्यक्ष मनोज तोरस्कर सर्व कर्मचारी वर्ग, सर्व इन्स्पेक्टर, हितचिंतक, मित्रपरिवार, नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)