ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून निघालेली मोदी एक्सप्रेस सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना ;आमदार नितेश राणे यांनी दादर रेल्वे स्टेशनवर दाखवला हिरवा झेंडा.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून निघालेली मोदी एक्सप्रेस सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना ;आमदार नितेश राणे यांनी दादर रेल्वे स्टेशनवर दाखवला हिरवा झेंडा.

प्रकाशन: 29 Aug 2022 02:19 PM
वाचन संख्या 116

विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वोच्च आस्थेच्या श्री.गणेशोत्सवाच्या निमित्ताने आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून कोकणवासीय चाकरमान्यांकरिता दादर ते कणकवली पर्यंत सोडण्यात आलेली मोदी एक्स्प्रेस आज सकाळी १०.३० वाजता दादर स्टेशनवरून कोकणाकडे रवाना झाली. प्रवाशांच्या प्रचंड गर्दीत आणि बाप्पाच्या जयघोषात ही रेल्वे सिंधुदुर्गाकडे रवाना झाली. आमदार नितेश राणे यांनी दादर स्टेशनवर मोदी एक्स्प्रेस ला झेंडा दाखवला. रात्री ८ च्या दरम्यान मोदी एक्स्प्रेस कणकवली स्टेशनवर पोहोचणार आहे.

गेली १० वर्षे अविरतपणे आमदार नितेश राणे यांनी गणेशभक्तांना स्वखर्चाने प्रवासाची सुविधा दिली आहे. ८ वर्षे १०० रुपयांत कोकण प्रवास नंतर गेली २ वर्षे पूर्ण ट्रेन प्रवासासाठी विनामूल्य उपलब्ध करून दिली आहे. दरवर्षी राबवत असलेल्या या उपक्रमाबद्दल गणेशभक्तांनी समाधान व्यक्त करत आमदार नितेश राणे यांचे आभार मानले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स