ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
सत्तेच्या गुळाला डसणार्या डोंगळ्यांना शिवसेना कधीच समजणार नाही : बबन शिंदे

सत्तेच्या गुळाला डसणार्या डोंगळ्यांना शिवसेना कधीच समजणार नाही : बबन शिंदे

प्रकाशन: 29 Aug 2022 01:56 PM
वाचन संख्या 306

शिवसेना उपजिल्हा प्रमुख बबन शिंदेंनी एकनाथ शिंदे गटात गेलेल्या फुटीरांना ऐकवले खडे बोल.

ज्यांचे काही बिघडवता येत नाही त्यांची नावे बिघडवणे एवढेच विरोधकांना काम असल्याचा लगावला टोला.

मालवण | सुयोग पंडित :सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेना उपजिल्हा प्रमुख बबन शिंदेंनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याच्या चर्चांना व अफवांना उधाण आल्यानंतर स्वतः बबन शिंदेंनी याबाबत प्रसिद्धी पत्राद्वारे विरोधकांचा खरपूस समाचार घेतला आहे.

अफवा आणि संभ्रम पसरवून कोकणातील मुळ शिवसेनेत दुही माजवण्याचा शिंदे गटाचा हा केविलवाणा प्रयत्न असल्याचे शिवसेना उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.

गेल्या काही महिन्यातील राजकीय घडामोडी पाहता सुरवातीच्या काळात आमदार खासदारांचा मिळणारा प्रतिसाद बघून एकनाथ शिंदे गट कमालीचा सुखावला होता आणि शिवसेनेच्या मुळावर घाव घालण्याची तयारी करत होता. परंतु आता आमदार आदित्य ठाकदेंच्या झंझावाती संवाद दौऱ्यानंतर त्यांच्या पायाखालची जमीन सरकू लागली आहे. या दौऱ्यानंतर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे कोकणातील आमदार खासदार आणि नेते जरी आपली कातडी वाचवण्यासाठी एकनाथ शिंदे गटात गेले असले तरी सामान्य शिवसैनिक हे मातोश्री आणि ठाकरे यांच्यासोबत ठामपणे उभे आहेत असेही बबन शिंदेंनी ठणकावून सांगितले आहे.

कोंकण हा नेहमीच शिवसेनेचा गड राहिला आहे आणि पुढेही तो अबाधित राखला जाईल. एकनाथ शिंदेंना केसरकर आणि सामंत यांच्या जीवावर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत शिवसेनेला धक्का द्यायचा होता. परंतु ईडीच्या भीतीने लोटांगण घालणारे शिवसैनिक नसतात याची जाणीव त्यांना नव्हती. मुळात सत्तेच्या गुळाला डसलेल्या डोंगळ्यांना शिवसेना आणि शिवसैनिक काय असतो हे कधीच समजणार नाही असाही उपरोधक टोला उपजिल्हा प्रमुख बबन शिंदेंनी लगावला आहे.

राणें विरुद्धच्या संघर्ष काळात आम्हाला मोठ्या रकमांच्या ऑफर्स आल्या होत्या, पदांच्या ऑफर्स होत्या प्रसंगी जिवाचीही भीती होतीच तरीही आम्ही मातोश्री बरोबर ठामपणे उभे राहिलो. ज्या व्यक्तीची निष्ठा जीवावर बेतलेले असतानाही अबाधित राहिली ती व्यक्ती केसरकर-सामंत-शिंदेंच्या फसव्या अमिशांना बळी पडणार नाही. सिंधुदुर्गातील शिवसेनेला धक्का देता येत नाही हे शिंदे गटाच्या लक्षात आले आहे आणि म्हणूनच आमचे जुने फोटो शोधून काढत ते आज व्हायरल केले जात आहेत.
जुने फोटो व्हायरल करून सेनेत दुही माजवण्याचा केविलवाणा प्रयत्न शिंदे गटाकडून सुरू आहे.

सिंधुदुर्गातील शिवसेना ही खासदार विनायक राऊत , आमदार वैभव नाईक आणि संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्या नेतृत्वाखाली निष्ठेने कार्यरत आहे. शिवसेनेच्या मतांवर निवडून आलेले नेते शिंदे गटात गेले पण शिवसेनेचा मतदार आणि सामान्य शिवसैनिक आजही ठाकरेंसोबत आहे हेच केसरकर आणि सामंत यांना सहन होत नसल्याने त्यांच्या समर्थकांकडून फोटो व्हायरल करून अफवा पसरवणे असले बालिश प्रकार सुरू आहेत. असल्या प्रकारांना आम्ही मुळीच भीक घालत नाही आणि त्यामुळे ठाकरेंना दगा व पर्यायाने सिंधुदुर्गातील जनतेचा विश्वासघात आमच्याकडून होणार नाही. माझ्या जिल्ह्यातील बहुतांश पदाधिकारी हे आजही फक्त ठाकरे कुटुंबाशी इमान राखून आहेत ज्यांना जनाधार नाही अशी काही मोजकी टाळकी जरी शिंदे गटात गेली असली तरी त्यांची काय लायकी आहे हे केसरकर आणि सामंत यांना माहीत असल्याने शिवसेनेच्या निष्ठवंतांना बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे तसेच कोर्टाचा निकाल काहीही लागो आम्हाला त्याने फरक पडत नाही. आम्ही काल-आज आणि उद्याही शिवसेने सोबत राहणार एवढं नक्की अशी ग्वाही उपजिल्हा प्रमुख बबन शिंदेंनी दिली आहे.

आम्हाला ना ईडीची भीती आहे ना पन्नास खोक्यांची गरज आणि जी पदे आम्हाला उद्धव साहेबांनी दिली आहेत त्यात आम्ही समाधानी आहोत व त्याला 100 टक्के न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू हे सांगताना त्यांनी
शिंदे गटात गेलेल्या केसरकर व सामंत यांना शुभेच्छा दिल्या आहेत .
माझ्या रक्तात गद्दारी नाही. “अक्सर लोग जिनका काम बिगाड़ नही सकते उनका नाम बिगाड़ देते हैं.” लोकांना माझे कार्य माहीत आहे आणि म्हणूनच शिवसैनिक व सामान्य जनता माझ्या सोबत आहे. तुम्हाला विश्वास बसत नसेल तर द्या राजीनामा आणि घ्या जनमत. तुमच्या गद्दारीचे उत्तर सिंधुदुर्गातील जनता दिल्याशिवाय राहणार नाही असेही बबन शिंदेंनी प्रसिद्धी पत्राद्वारे जाहीर केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स