ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
मोदी एक्स्प्रेस कोकणाकडे निघाली ; टाळ मृदुंगाच्या गज़रात हिरवा कंदिल.

मोदी एक्स्प्रेस कोकणाकडे निघाली ; टाळ मृदुंगाच्या गज़रात हिरवा कंदिल.

प्रकाशन: 28 Aug 2022 07:25 PM
वाचन संख्या 188

विवेक परब |एडिटोरिअल असिस्टंट : कोकणच्या श्री गणेशोत्सवाची आता राज्य व केंद्रामार्फत अतिशय नियोजनबद्ध दखल घेतली जाऊ लागली आहे याची प्रचिती आज दादर रेल्वे स्थानकामध्ये आली.
“गणपती बाप्पा मोरया” च्या गजरात आणि टाळ मृदुंग वाजवत आज चाकरमानी गणेशोत्सावासाठी कोकणाच्या दिशेने रवाना झाले. मुंबई भाजपाच्या वतीने खास मोदी एक्स्प्रेसची व्यवस्था करण्यात आली.

दादर रेल्वे स्थानकातून मोदी एक्सप्रेसला राज्याचे महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा, विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते आमदार प्रविण दरेकर यांनी हिरवा कंदिल दाखवला. मोदी एक्सप्रेसमधून एकूण १८०० प्रवासी कोकणात गणेशोत्सवासाठी रवाना झाले. या उपक्रमासाठी मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार अतुल भातखळकर, आमदार नितेश राणे, आमदार प्रसाद लाड, महामंत्री संजय उपाध्याय यांच्यासह भाजपा पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

मुंबईमधून मोठ्या संख्येने चाकरमानी गणेशोत्सवासाठी कोकणात जातात. या पार्श्वभूमीवर मोदी एक्सप्रेसची सोय करण्यात आली आहे. गतवर्षी कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी भाजपाच्या वतीने मोदी एक्स्प्रेस चालवण्यात आली होती. त्याला कोकणवासीयांचा अभुतपूर्व प्रतिसाद मिळाला होता. मोदी एक्स्प्रेसच्या माध्यमातून मुंबईतून कोकणात जाणाऱ्या चाकरणमान्यांच्या मोफत प्रवासाची व्यवस्था करण्यात आली होती. या एक्स्प्रेसचा गेल्या वर्षी अनेक प्रवाशांनी लाभ घेतला. दरम्यान यंदाही मुंबई भाजपाच्या वतीने मोदी एक्स्प्रेस चालवण्यात आली आहे.

गणेशभक्तांनी या सेवेबद्दल आनंद व्यक्त करताना भारतीय जनता पक्षाचे आभार मानले. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला आहे. “राज्यात गणेशोत्सव अत्यंत आनंदाने साजरा केला जातो. मोदी एक्सप्रेस या रेल्वेमुळे कोकणवासी खूश आहेत,” असं मत राज्याचे महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स