नगरपरिषदेने सुरळीत केला भाजी मार्केटकडे जाणारा रस्ता.
मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या बंदरजेटी किनारपट्टीहून भाजी मार्केटकडे जाणारा रस्ता मालवण नगरपरिषद प्रशासनाने सुरळीत केला आहे.
डिझेल पंपासमोरील मोरीवरील हा रस्ता तथा ‘ॲप्रोच वे’ खचला होता. मालवण नगरपरिषद प्रशासनाने तिथे भराव घालत डागडुजी करुन हा रस्ता सुरळीत केला आहे.
या ठिकाणी बाजारपेठेतून येणारे पावसाळी पाणी निचरा होण्याचा मार्ग असून या ठिकाणी केवळ पायी ये जा करण्यापूर्ती एक फरशी तात्पुरत्या स्वरुपात ठेवण्यात आली होती.
परंतु आगामी उत्सव विचारात घेता व बाजारपेठेतील वाढती रहदारी विचारात घेता मुख्य अधिकारी यांच्या सूचनेनुसार तातडीने तात्पुरता पाईप क्रॉसिंग करून नागरिकांना पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)