प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेचा लाभ घ्या ; तालुका कृषि अधिकारी विश्वनाथ गोसावी यांचे आवाहन..!
मालवण येथे कार्यशाळा संपन्न..!
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME) अंतर्गत कृषि प्रक्रिया जागृती पंधरवडा अंतर्गत तालुका कृषि अधिकारी कार्यालय मालवण येथे कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. कार्यशाळेच्या सुरुवातीला प्रास्ताविक तालुका कृषि अधिकारी विश्वनाथ गोसावी यांनी केले. या कार्यशाळेत जिल्हा संसाधन व्यक्ती श्रीम. अरिता तेंडोलकर यांनी उपस्थितांना योजनेबाबत सविस्तर असे मार्गदर्शन करुन योजनेअंतर्गत 35% अनुदान रक्कम रु. 10 लाखापर्यंत अनुदान मर्यादा असल्याचे त्यांनी सांगितले व लाभार्थ्यांच्या योजनेविषयी शंकांचे समाधान केले.
यावेळी विविध अन्न प्रक्रिया करणारे प्रक्रियादार तसेच कृषि विभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी आदी उपस्थित होते. प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत मालवण तालुक्यातील प्रक्रियादारांना प्रक्रिया व्यवसाय विस्तार करणे अथवा नव्याने अन्न प्रक्रिया करु इच्छिणाऱ्या लाभार्थ्यांनी आपली प्राथमिक माहिती तालुका कृषि अधिकारी कार्यालय मालवण व्दारे प्रसारीत केलेल्या लिंकव्दारे गुगल फॉर्मवर भरुन सबमिट करण्याविषयीचे आवाहन मालवण तालुका कृषि अधिकारी विश्वनाथ गोसावी यांनी केले आहे.
सदर माहिती एकत्रित करुन पुढील कार्यवाहीसाठी नेमणूक झालेल्या जिल्हा संसाधन व्यक्ती यांचेकडे देण्यात येणार आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)