ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
महामार्गावर भीषण अपघात..!

महामार्गावर भीषण अपघात..!

प्रकाशन: 26 Aug 2022 06:26 PM
वाचन संख्या 215

विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट : ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथे एका भीषण अपघाताची नोंद झाली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुंबई गोवा महामार्गावर गड नदी पूलालगत कंटेनर ची मॅक्स पिकअप वाहनाला धडक बसली यात मॅक्स पिकअप वाहनाचा चालक जागीच ठार झाला. दुपारी अडीच च्या सुमारास ही घटना घडली.

Article image

याबाबत अधिक वृत्त असे की
मुंबईच्या दिशेने येणारा कंटेनर रस्ता सोडून बंद असलेल्या लेनवर जाऊन धडकला. याच दरम्यान समोरून येणारी मॅक्स गाडीला जोरदार धडक दिल्याने अक्षरशः मॅक्सचा चक्काचूर झाला. यात मॅक्स चालक जागीच चिरडला आणि त्याचा मृत्यू झाला. मुंबई गोवा महामार्गावर गड नदी पूल ते गोपुरी आश्रम यादरम्यान एकच मार्गिका चालू आहे त्यामुळे वाहन चालकांना रस्त्याचा अंदाज येत नाही. एकाच मार्गीचे वरून दोन्ही दिशेची वाहने ये जा करत असल्याने सातत्याने अपघात होत आहेत.

फोटो सौजन्य | कणकवली ब्युरो.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स