ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या मालवण बंदरजेटी स्टॉलधारक असोसिएशनच्या अध्यक्षपदी सौ.पूजा सरकारे यांची एकमताने निवड.

पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या मालवण बंदरजेटी स्टॉलधारक असोसिएशनच्या अध्यक्षपदी सौ.पूजा सरकारे यांची एकमताने निवड.

प्रकाशन: 24 Aug 2022 09:35 AM
वाचन संख्या 366

पर्यटन व्यावसायिक महासंघाचे जिल्हाध्यक्ष विष्णू मोंडकर यांनी जाहीर केली निवड.

मालवण | सुयोग पंडित :सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण बंदरजेटी येथे गेले http://localhost/news/public/uploads/20 वर्षापेक्षा जास्त काळ स्थानिक व्यासायिकांच्या माध्यमातून 35 पेक्षा जास्त स्टॉलधारक सिंधुदुर्ग किल्ल्यावर छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या देशविदेशातील लाखो पर्यटक,शिवप्रेमी यांना सेवा पुरवीत आहेत त्यामुळे गेले अनेक वर्षे येणाऱ्या पर्यटकांना कुठल्याही गैरसोयींना सामोरे जावे लागत नाही याबंदरजेटी परिसरात उभे असलेले स्टॉल हे मेरीटाईम बोर्डाच्या मालकीच्या जमिनीत असल्यामुळे सदर स्टॉल काढून टाकण्यासाठी शासनाच्या कारवाईच्या नोटिसां कायम स्वरूपी व्यावसायिकांना येत असल्यामुळे बेरोजगार होण्याची भीती कायम व्यवसायिकांवर आहे .

या संबंधी येथील स्टॉल धारकांनी पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या पदाधिकारी यांच्याशी संपर्क साधल्यानंतर महासंघा मार्फत सदर विषयी मार्ग काढून व्यावसायिकांना न्याय देण्यासाठी महासंघ पूर्ण पणे स्टॉल धारकाच्या सोबत असून यासाठी पर्यटन व्यावसायिक महासंघाच्ची मालवण बंदरजेटी स्टॉलधारक असोशिएशन स्थापन करण्यात आली असून अध्यक्ष पदी सौ .पूजा सरकारे यांची निवड महासंघ अध्यक्ष श्री विष्णू मोंडकर यांनी केली.
या वेळी महासंघाच्या मालवण महिला तालुका अध्यक्ष मेघा सावंत यांच्या हस्ते पुष्यगुश्य त्यांना देण्यात आला .महासंघाच्या माध्यमातून मेरीटाईम बोर्ड विभागास पत्रव्यवहार करुन सदर स्टॉल धारकास पर्यटन पूरक स्वरूप असलेले स्वखर्चातून उभारलेले आर्कषक स्टॉलला व्यवसाय करण्यास जागा मिळण्यासाठी पाठपुरावा केला जाणार असून सदर स्टॉल ची डिझाईन साठी श्री गुरुनाथ राणे यांना सर्वानुमते जबाबदारी दिली आहे या विषयी कायमस्वरूपी मार्ग काढण्यात येणार आहे यावेळी महासंघ खजिनदार श्री गुरुनाथ राणे ,लिकर असोशिएशन जिल्हाध्य्क्ष श्री शेखर गाड,मालवण शहर अध्यक्ष श्री मंगेश जावकर ,श्री विनायक परब तसेच स्टॉल धारक मोठ्या संख्येने उपस्थित होते .

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स