ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
आमदार वैभव नाईक सलग दुसर्या दिवशीही विधानसभेत आक्रमक..!

आमदार वैभव नाईक सलग दुसर्या दिवशीही विधानसभेत आक्रमक..!

प्रकाशन: 23 Aug 2022 03:59 PM
वाचन संख्या 213

कोकणातील शेतकर्यासाठी घेतलाय आक्रमक पवित्रा ; भात खरेदीवर बोनस जाहीर करण्यासाठी आमदार वैभव नाईक आग्रही…!

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासकीय भात खरेदी केंद्रावर भात खरेदी केल्यानंतर त्यावर देण्यात येणारा बोनस अद्याप जाहीर केलेला नसल्याने या मुद्द्यावरून आमदार वैभव नाईक यांनी सलग दुसऱ्या दिवशी विधानसभेत आक्रमक भूमिका घेतली. काल या मुद्द्यावरून आमदार वैभव नाईक यांनी आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला प्रश्न विचारला होता. मात्र त्यावर कोणतेही सकारात्मक उत्तर मिळाले नव्हते.

दरम्यान आज विधानसभेत धान खरेदी मुद्द्यावर चर्चा सुरू असताना या दरम्यानच आमदार वैभव नाईक यांनी सिंधुदुर्गासह कोकणातील शेतकऱ्यांनी शासकीय भात खरेदी केंद्रात भात देऊन देखील त्याची बोनस रक्कम अद्याप जाहीर केली नसल्याबाबत लक्ष वेधले. आमदार वैभव नाईक यांनी सलग दुसऱ्या दिवशी या मुद्द्यावरून विधानसभेत आवाज उठवला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी शासकीय भात खरेदी केंद्रावर भात विक्री केली होती. मात्र यावर्षी शेतकऱ्यांना बोनस रक्कम जाहीर झाली नव्हती. याबाबत आमदार वैभव नाईक यांनी यापूर्वी देखील अनेकदा आवाज उठवला होता. दरम्यान काल सोमवारी व आज मंगळवारी सलग दोन दिवस कोकणातील भात शेतकऱ्यांना बोनस जाहीर करण्याचा मुद्दा आमदार वैभव नाईक यांनी विधानसभेत लावून धरला. या प्रश्नी आता सरकार काय निर्णय घेते त्याकडे कोकणातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स