नामदार जगन्नाथ शंकरशेठ यांची पुण्यतिथी भावपूर्ण उत्साहात संपन्न.
माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांच्यासह असंख्य दैवज्ञ बांधव व मान्यवरांची उपस्थिती.
मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे दैवज्ञ हीतवर्धक समाज मालवण व दैवज्ञ महिला मंडळ यांच्या संयुक्त सहयोगाने मुंबईचे शिल्पकार नामदार जगन्नाथ शंकरशेठ यांची 157 की पुण्यनिधी विविध कार्यक्रमांनी संपन्न झाली. दैवज्ञ भवन, मालवण येथे हा पुण्यतिथी तथा स्मृतीवंदन सोहळा 31 जुलै रोजी संपन्न झाला.
सुरवातीला दीपप्रज्वलनानंतर सन्माननीय नानांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन वंदन केले गेले.
उपस्थितांचे स्वागत अपर्णा कुडाळकर यांनी स्वागतगीताने केले. व्यासपीठावरील मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातील्या गेल्या वर्षभरातील मालवणातील दिवंगतांना दोन मिनिटे स्तब्ध राहून आदरांजली अर्पण करण्यात आली.
सौ.संजोक्ती कुडाळकर : (अध्यक्ष है, महिला मंडळ)यांच्या प्रास्ताविकानंतर कै.नाना शंकरशेठ यांच्या जीवनावर आधारीत स्फूर्तीदायक चित्रफीत दाखवण्यात आली, यासाठी सत्यम् कॉम्प्युटरचे श्री. दीपक शिवापूरकर यानी विशेष सहकार्य केले. याप्रसंगी श्री अरविंद सराफ, श्री. दिलीप हिर्लोस्कर , श्री. विश्वास (बंडू) कांदळगांवकर यांच्या विशेष कार्याबद्दल सत्कार करण्यात आला.
येत्या आगामी वर्षभराचा आराखडा सौ. सुप्रिया पेंडूरकर (सेकेटरी दैवज्ञ महिला मंडळ) यांनी सादर केला. याप्रसंगी मालवणच्या 45 गुणवंत दैवज्ञ विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन गौरवण्यात आले.
याप्रसंगी मालवणमधील दैवज्ञ बालकांचे विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम झाले यामध्ये दीक्षांत शिवापूरकर,वरद निव्हेकर,सायली पेडणेकर,स्वरा मालंडकर,निखील भुर्के,जुई धारगळकर,चैत्रा जामसंडेकर, कनक पेंडुरकर,पुनीत जामसंडेकर यांनी आदर्श सहभाग घेतला.
यावेळी व्यासपीठावर श्री. अरविंद सराफ, श्री. दिलीप हिर्लोस्कर, श्री अनिल मालवणकर, मालवणचे माजी नगराध्यक्ष सन्माननीय
श्री महेश कांदळगांवकर , सौ संजीवनी कुडाळकर, सौ सुप्रीया पेंडुरकर ,सौ प्रियांका जामसंडेकर अमिता निव्हेकर, श्री गजानन मालंडकर, श्री रमेश आचरेकर हे मान्यवर उपस्थित होते. आभार सौ. प्रियांका जामसंडेकर (खजिनदार है महिला मंडळ) यांनी मानले. सूत्रसंचालन कु. गौतमी प्रकाश कुडाळकर हिने केले.
अल्पाहाराने कार्यक्रमाची सांगता झाली
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)