ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
अनियमित वीजपुरवठ्या बाबत भाजपा वीज अधिकाऱ्यांना जाब विचारणार...!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

अनियमित वीजपुरवठ्या बाबत भाजपा वीज अधिकाऱ्यांना जाब विचारणार...!

प्रकाशन: 21 Aug 2022 11:56 AM
वाचन संख्या 28

प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई , जिल्हा सरचिटणीस , भाजपा सिंधुदुर्ग.

चिंदर | विवेक परब :
वेंगुर्ले शहराबरोबर तालुक्यामध्ये काही दिवस सातत्याने वीजपुरवठा खंडित होण्याबरोबर कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने शहरातील नागरिकांना तसेच तालुक्यातील ग्रामस्थांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. याबाबत वीज अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी सोमवार दिनांक २२ ऑगस्ट रोजी सकाळी ११ :०० वाजता भाजपा वेंगुर्ले च्या वतीने विज वितरण कार्यालयावर धडक देणार असल्याचे भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई यांनी सांगितले.

सद्ध्या सणासुदीचा काळ सुरू असुन, येत्या काही दिवसांत गणेशोत्सव सुरू होणार आहे. परंतु सातत्याने वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे गणेशोत्सवापुर्वी करण्यात येणारया कामांचा खेळखंडोबा होत आहे. त्याचप्रमाणे कमी दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे गृहीणी तसेच व्यापारी वर्गाला त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

वारंवार वीज पुरवठा खंडीत होत असल्याने गणेश मुर्तीकारांच्या कामावर परीणाम होत आहे. गणेश चतुर्थी एक आठवड्यावर आल्यामुळे मुर्तीकारांची लगबग सुरू आहे, परंतु सातत्याने विज प्रवाह खंडित होत असल्यामुळे मुर्तीकारांना काम करणे कठीण बनले आहे.

तसेच कमी दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे तसेच अति उच्च दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे गेल्या महीन्या भरात अनेकांचे इन्हर्टर, पंखे तसेच दुरदर्शन संच जळाल्याच्या घटना घडल्या आहेत.

याबाबत विज वितरण विभागास जाब विचारण्यासाठी भाजपा वेंगुर्ले चे कार्यकर्ते , सोमवार दिनांक २२ ऑगस्ट रोजी सकाळी ११:०० वाजता अधिकारयांना भेटणार आहेत, तरी समस्त वेंगुर्ले वासीयांनी यावेळी सहभागी व्हावे असे आवाहन भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई यांनी केले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स