ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
क्रीडा तपस्वी अशोक दाभोलकर, शशिकांत गवंडे यांचा बेळगाव येथे सन्मान..!

क्रीडा तपस्वी अशोक दाभोलकर, शशिकांत गवंडे यांचा बेळगाव येथे सन्मान..!

प्रकाशन: 18 Aug 2022 01:09 PM
वाचन संख्या 53

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
शामरंजन बहुउद्देशीय फाऊंडेशन मुंबई व विद्यार्थी विकास अकादमी महाराष्ट्र आयोजित ” राष्ट्रीय संस्कृती ” संमेलन लोकमान्य रंगमंदिर बेळगाव येथे दिमाखात संपन्न झाले. यावेळी राष्ट्रीय स्तरावर क्रीडा तसेच सामाजिक क्षेत्रात दिलेल्या निस्वार्थ सेवेबद्दल सिंधुदुर्ग वेंगुर्ल्याचे सुपुत्र क्रीडा तपस्वी अशोक दाभोलकर (दाभोली) ह्यांना “भारत कर्तव्यम क्रीडा समाजभूषण पुरस्कार:२०२२” व शशिकांत गवंडें ह्यांना “शिवछत्रपती एकात्मता पुरस्कार:२०२२” तसेच शाल, श्रीफळ, मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

सदर संमेलनात केंद्र शासनाचा पद्मश्री पुरस्कार प्राप्त डॉ. रविंद्र कोल्हे तसेच डॉ. स्मिता कोल्हे ह्यांच्या शुभहस्ते साहित्य, कला, क्रीडा, सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांना सन्मानीत करण्यात
आले. संमेलनाचे उद्घाटक श्री. अशोक दाभोलकर हे होते तसेच व्यासपीठावर सर्वश्री राक्षे ( संमेलनाध्यक्ष), दिपक बोडरे, बाबाजी शिंदे, डॉ .बी. एन. खरात, कृष्णा बामणे, श्रीमती स्वाती पवार, श्रीमती रिया पाटील हे मान्यवर उपस्थित होते.
संमेलनात पद्मश्री डॉ .रविन्द्र कोल्हे, राक्षे तसेच अशोक दाभोलकर ह्यानी आपले विचार मांडले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. वैभव खानोलकर केले तसेच प्रास्ताविक व आभार डॉ बी. एन. खरात यांनी मानले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स