खारेपाटण येथे ८० हजारांचे सागवान जप्त
कणकवली | उमेश परब : गुरुवारी रात्री खारेपाटण व तपासणी नाका येथे ८० हजाराचे सागवान लाकूड बेकायदा वाहतूक होत असताना जप्त करण्यात आले. टेम्पो ५ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वनरक्षक संजीव जाधव, वनरक्षक विश्वनाथ माळी, वनरक्षक चंद्रिका लोहार यांनी सागाची ही अवैध लाकूड वाहतूक रोखली. याप्रकरणी रियाज अजित चौगुले (रा. पोभूर्ले) व रुपेश यशवंत महाडिक ( रा. फणसगाव) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टेम्पो जप्त करून आतील आकडासह टेम्पो वनविभागाच्या फोंडा घाट येथील विक्री आगारात आणण्यात आला.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)