ओसरगाव येथे देशभक्तीपर गीत गायन महोत्सव…!
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत ओसरगाव ग्रामपंचायत मार्फत देशभक्तीपर गीत गायन महोत्सव शाळा ओसरगाव नंबर १ येथे आयोजित करण्यात आली.
यावेळी सरपंच श्री.प्रमोद कावले, उपसरपंच श्री.मुरलीधर परब, ग्रामपंचायत सदस्या श्रीम. अक्षता राणे, ग्रामपंचायत सदस्य श्री. हेमंत तांबे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा श्रीम. सुप्रिया अपराज केंद्रप्रमुख श्री. सुरेश हरकुळकर, शाळेचे मुख्याध्यापक श्री. किशोर कदम आणि ग्रामसेवक श्री. तळवडेकर आरोग्य सेवक डागमोडेकर उपस्थित होते.
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम जागृत व्हावे, मुलांच्या ओठावर देशभक्तीपर गीत सतत गुणगणत राहावी, स्वातंत्र्य, समता, बंधुता ही तत्व विद्यार्थ्यांनी आचरणात आणावीत यासाठी ग्रामपंचायत च्या वतीने ओसरगाव नंबर १ या शाळेत देशभक्तीपर गीत गायन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते .या महोत्सवात ओसरगाव गावातील सर्व सहा शाळा ओसरगाव मळी, ओसरगाव खासकील, ओसरगाव गवळ,ओसरगाव बौद्धवाडी,ओसरगाव कानसळी आणि ओसरगाव नंबर १ या शाळा आणि सर्व अंगणवाडी सहभागी झाल्या होत्या. सहभागी शाळांना गावचे सरपंच श्री .प्रमोद कावले यांनी विशेष सन्मानपत्र देऊन सर्व शाळांचा सन्मान केला. तसेच यशस्वी आयोजनाबद्दल ओसरगाव नंबर १ या शाळेचे मुख्याध्यापक श्री. किशोर कदम यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमास शिक्षिका श्रीमती तांबे मॅडम ,श्रीमती मोडक मॅडम, श्री. चोडणेकर सर ,श्रीमती दांडेकर मॅडम, श्रीमती महाजन मॅडम ,श्री. हरमलकर सर,श्री .गोसावी सर,श्री .तांबट सर,श्रीमती पावसकर मॅडम अंगणवाडी सेविका येरलकर,इत्यादी शिक्षक उपस्थित होते .तसेच या कार्यक्रमास मोठ्या संख्येने पालकवर्ग उपस्थित होता. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ओसरगाव नंबर १ शाळेचे मुख्याध्यापक श्री. किशोर कदम सर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री.चोडणेकर सर यांनी केले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)