समस्त मराठा समाजाचा बुलंद आवाज हरपला.
शिवसंग्राम चे नेते माजी आमदार विनायक मेटे यांचे आज पहाटे मुंबई – पुणे एक्स्प्रेस हायवेवर अपघातात निधन…
संतोष साळसकर | ब्युरोचीफ :
शिवसंग्राम चे नेते तथा माजी आमदार विनायक मेटे यांच्या गाडीला मुंबई – पुणे एक्स्प्रेस हायवेवर आज पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास अपघात झाला असून या अपघातात विनायक मेटे यांचे दुर्दैवी निधन झाले आहे. त्यांच्या अपघाती निधनाने मराठा समाजाचा बुलंद आवाज हरपला.
फोर्ड Endeavour MH 01 DP 6364 ही गाडी चालक एकनाथ कदम हे मा. विधान परिषदेचे आमदार विनायक मेटे(केज-बीड) यांना घेऊन मुंबई बाजूकडे दुसरे लेनने जात असताना कार चालक यांचा त्यांच्या गाडीवरील त्यांचा ताबा सुटून पुढे जाणाऱ्या अज्ञात वाहनाला ठोकर मारून अपघात झाला आहे. सदर अपघातात आमदार विनायक मेटे हे अत्यंत गंभीर जखमी झाल्याने त्यांना तात्काळ आयआरबी ॲम्बुलन्स एमजीएम हॉस्पिटल कामोठे येथे उपचारा कामी दाखल केले असता डॉ.धर्मांग यांनी तपासून मयत घोषित केले आहे. व बाॅडीगार्ड पोलिस हवालदार राम ढोबळे हे कारमध्ये अडकल्याने कारमधून बाहेर काढून आय आर बी रुग्णवाहिकेने तात्काळ MGM हॉस्पिटल,कामोठे येथे उपचारासाठी नेण्यात आले आहे. कार आयआरबी क्रेनच्या साह्याने रस्त्याचे बाजूला घेतली आहे. सदर वेळी आम्ही व PSI चव्हाण साहेब तसेच रसायनी पोलीस स्टेशन api बालवडकर व स्टाफ तसेच irb चे नवनाथ गोळे आणि स्टाफ हजर होते.सदर अपघाताची माहिती रसायनी पोलीस स्टेशनला दिली आहे
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)