शासकिय मत्स्यव्यवसाय प्रशालेच्या विद्यार्थ्यांची अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त प्रभातफेरीद्वारे मानवंदना..!!
तारकर्ली | सुरेश बापार्डकर :
तारकर्ली एम. टी. डी .सी मध्ये मुलांसमवेत प्रभात फेरी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त तारकर्ली येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांनी शासकीय मत्स्य व्यवसाय शाळेचा कार्यक्रम झाल्यावर काढण्यात आली. एम. टी डी .सी मध्ये मुलांना घेऊन येण्याचे आमंत्रण वेर्णेकर यांनी दिलं असल्याने सर्व मुले घेऊन त्यांच्या मेन गेट कडून प्रभात फेरी संपूर्ण आतील परिसरात काढण्यात आली.
त्यानंतर देशभक्तीपर समूहगीत सादर करण्यात आले. महामंडळाचे व्यवस्थापक श्री.श्रीकृष्ण वेर्णेकर आणि कर्मचारी गणपत मोंडकर यांनी एम. टी .डी .सी चे पर्यटकांना दिले जाणारे रूम कशाप्रकारे आहेत हे रूम ओपन करून त्यासंबंधीची सर्विस्तर माहिती मुलांना देण्यात आली .श्री. वेर्णेकर यांनी उपस्थित शिक्षक आणि ग्रामस्थ सर्व मुल यांचे स्वागतपर आभार मानले.त्यानंतर सर्व मुलांनी एम .टी .डी सी मधील घसरगुंडी, झोपाळा,अन्य खेळाच्या माध्यमातून मनोरंजन केले.यावेळी मुख्यद्यापिका सौ.साक्षी कासकर,शिक्षक श्री.रवींद्र गोसावी, शिक्षिका सौ.सुगंधा लंगवे ,व्यवस्थापक श्री.श्रीकृष्ण वेर्णेकर,कर्मचारी श्री.गणपत मोंडकर,श्री.संदीप मालवणकर,श्री.दशरथ कदम,शुभदा चव्हाण, वर्षा मालवणकर,सर्व निवाशी कर्मचारी आणि पर्यटक पाहुणे उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)