ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
<em>कॅबिनेट मंत्री दीपक केसरकर यांचे बांदा शहरात त्यांच्या समर्थकांकडून जंगी स्वागत..!</em>

<em>कॅबिनेट मंत्री दीपक केसरकर यांचे बांदा शहरात त्यांच्या समर्थकांकडून जंगी स्वागत..!</em>

प्रकाशन: 14 Aug 2022 09:21 AM
वाचन संख्या 49

बांदा | राकेश परब :
महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्री पदाची शप्पत घेतल्यानंतर जिल्ह्यात प्रथम आलेल्या मंत्री दीपकभाई केसरकर यांचे बांदा शहरात जंगी स्वागत करण्यात आले. बांदा येथे आगमन होताच गडगेवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. ढोलताशाचा गजर, फटाक्यांची आतषबाजी व कार्यकर्त्यानी दिलेल्या गगनचुंबी घोषणांनी परिसर दणाणून गेले.यावेळी शिंदेगटाचे सावंतवाडी तालुकाप्रमुख नारायण राणे व बांदा शहर कार्यकर्त्यांनी मंत्री केसरकर यांचे पुष्पहार घालत स्वागत केले.यावेळी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.विशेष म्हणजे भाजपच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा मंत्री केसरकर यांचे स्वागत केले.

कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतल्या नंतर बांदा शहरात प्रथमच आगमन झालेल्या मंत्री केसरकर यांच्या स्वागतासाठी सायंकाळी चार पासूनच मोठी गर्दी केली होती. नियोजित वेळेच्या तासभर उशीर होऊन सुद्धा दीपकभाई प्रेमी कार्यकर्ते कट्टा कॉर्नर येथून हलले नाहीत. स्वागतासाठी ढोलपथक सुद्धा मागविण्यात आले होते. मंत्री केसरकर यांचे आगमन होताच कार्यकर्त्यांनी गगनचुंबी घोषणा दिल्या. हमारा नेता कैसा हो दीपकभाई जैसा हो, दीपकभाई आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा देण्यात आल्या.

यावेळी शिंदे गटाचे सावंतवाडी तालुका प्रमुख नारायण उर्फ बबन राणे, दीपकभाईप्रेमी संदेश पावसकर, सिंधुदुर्ग जिल्हा स्वा.मिल संघटचे उपाध्यक्ष आनंद गवस, ग्रामपंचायत सदस्य राजेश विर्नोडकर, कास सरपंच खेमराज भाईप, माजी जिल्हा परिषद सदस्य श्वेता कोरंगावकर, माजी सभापती शीतल राऊळ, माजी सरपंच मंदार कल्याणकर, सिद्धेश पावसकर, बाबा काणेकर, जगदेव गवस, भाऊ वाळके, प्रसाद पावसकर, दादा येडवे, साई करमलकर, भैय्या गोवेकर, पांडुरंग नाटेकर, राकेश वाळके,अनुप पावसकर, सुनील धामापूरकर, केदार कंणबर्गी,सुनील राऊळ आदीसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 22
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 329

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स